26/11 श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

26/11 श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

बारा वर्षांपूर्वी याच दिवशी (26/11) दहशतवाद्यांनी मुंबईवर भ्याड हल्ला केला होता आणि आज श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला करण्यात आला आहे

  • Share this:

श्रीनगर, 26 नोव्हेंबर : देशात एकीकडे संविधान दिन साजरा केला जात आहे. मुंबईतील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत असतानाच श्रीनगरमधून मोठी बातमी येत आहे. श्रीनगर परिसरात दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीनगरमधील HMT परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन जारी असून परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.दहशतवाद्यांनी परिमपुरा परिसरातील खुशीपुरा येथे सुरक्षा दलावर गोळीबार केला. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेवर काश्मीरचे आयजी म्हणाले की तीन दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन सैनिक गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत ते शहीद झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जैशचा हात आहे.

काश्मीरचे आयजी यांनी दिलेल्या माहितीनुसार जैशचा हात असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानचे तर एक स्थानिक आहे. तर हे दहशतवादी सुरक्षा दलावर गोळीबार करून फरार झाले आहेत. सुरक्षा दलाकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

बारा वर्षांपूर्वी याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवर भ्याड हल्ला केला होता आणि आज श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. काही दिवसांपूर्वी जम्मूतील नगरोटा भागातील टोल नाक्याजवळ 4 जैश एच्या दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला होते. हे दहशतवादी 26/11 दिवशी मोठा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर त्यांचा खात्मा करण्यात आला होता.

First published: November 26, 2020, 2:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या