श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; 1 जवान शहीद तर तीन दहशतवादी ठार

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; 1 जवान शहीद तर तीन दहशतवादी ठार

श्रीनगरमधील हमहमा भागातील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर आज पहाटे 4:30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाले आहे.

  • Share this:

श्रीनगर, 03 ऑक्टोबर: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या कॅम्पवर आज सकाळी दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. दरम्यान भारतीय जवानांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युतर दिलं असून तीन दहशतवाद्यांना सेनेने कंठस्नान घातले आहे. पण या हल्ल्यात 1 जवान शहीद झालाय. आणि 2 जवान जखमी झालेत.

श्रीनगरमधील हमहमा भागातील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर आज पहाटे 4:30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 3 जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला बीएसएफच्या 182 बटालियनवर करण्यात आला आहे. तर भारतीय सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जातय. श्रीनगरच्या अॅडमिन इमारतीत आणखी तीन ते चार दहशतावादी लपल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात जोरदार चकमक सुरु होती. दरम्यान गेल्या काही काळापासून ही चकमक थांबली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर श्रीनगर हायवेही बंद करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्याच्या हेतूनं आले होते. मात्र भारतीय लष्कराला त्यांची माहिती मिळताच त्यांनी चोख बंदोबस्त केला. त्यामुळे दहशतवाद्यांना विमानतळावर घुसता आलं नाही. या हल्ल्याच्या मागे जैश-ए-मुहम्मद या संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 08:41 AM IST

ताज्या बातम्या