Home /News /national /

जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; एक जण ठार, 34 जखमी

जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; एक जण ठार, 34 जखमी

terror attack

terror attack

एकीकडे जगभर रशिया विरुद्ध युक्रेनच्या युद्धाची दहशत असताना भारताच्या सीमेवरही दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीट भागात रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला.

    श्रीनगर, 7 मार्च: एकीकडे जगभर रशिया विरुद्ध युक्रेनच्या युद्धाची दहशत असताना भारताच्या सीमेवरही दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीट भागात रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला (Srinagar Grenade Attack) केला. यामध्ये एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून, जवळपास 34 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध लाल चौकाजवळील हरी सिंह हाय स्ट्रीट भागात संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी हा हल्ला झाला. या घटनेत जॉन मोहम्मद नावाच्या पोलिसासह 34 जण जखमी झाले आहेत. जखमींना श्री महाराजा हरिसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद अस्लम मखदूमी (70) असे मृताचे नाव असून तो शहरातील नौहट्टा भागातील रहिवासी होता. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीनगरमधील या ग्रेनेड हल्ल्यामागे नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजलेलं नाही. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. श्रीनगरमधील अमृता कादल मार्केटमध्ये हा हल्ला झाला. यावेळी तिथे मोठी गर्दी होती. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान श्रीनगरमध्ये हा हल्ला झाला आहे. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांनी अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुमार म्हणाले की, पोलिसांना काही महत्त्वाचे लीड्स मिळाले आहेत आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे." जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की, दहशतवादाची परिसंस्था मोडून काढण्याचा आणि शेजारील देशाच्या योजनांना हाणून पाडण्याचा सरकारचा निर्धार आहे. मी श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती दुःख व्यक्त करतो. असे ट्विट मनोज सिन्हा यांनी केले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Jammu kashmir, Terror attack

    पुढील बातम्या