Home /News /national /

भारताचे 5 शत्रू अटकेत, प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा कट उधळला

भारताचे 5 शत्रू अटकेत, प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा कट उधळला

जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

    श्रीनगर, 16 जानेवारी : जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रजासत्ताकदिनाच्या आधी मोठी कारवाई केली. जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दहशतवादी घातपाताच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला. पोलिसांनी सांगितलं की, पकडलेले दहशतवादी हजरतबल इथं झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर अनेक दहशतवादी काश्मीरमध्ये घातपात करण्यासाठी हालचाली करत आहेत. मात्र सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळं दहशतवादी कारवायांना चाप बसला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे की, श्रीनगर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांना पकडल्यानं मोठं यश मिळालं आहे. पाचही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून ते प्रजासत्ताक दिनाच्या आधी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे एजाज अहमद, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारुख, नसीर अहमद मीर अशी आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकं सापडली आहेत. यामध्ये 143 जिलेटिनच्या कांड्या, एक सायलेन्सर, 42 डेटोनेटर्स, रिमोटसह वॉकी टॉकी, आईडी आणि तीन पाकिटे भरलेल्या स्फोटकांचा यात समावेश आहे. वाचा : मालेगाव पुन्हा हादरलं, घरात घुसून महिलेवर गोळीबार
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या