श्रीनगर, 19 मे : दोन वर्षांनंतर श्रीनगरमध्ये रात्री उशिरा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना करत असतानाच रात्री उशिरा कानेमजार नवाकदल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चमकम झाली. या चकमकीनंतर श्रीनगरमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद कऱण्यात आली आहे. सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिळून दहशतवाद्यांविरोधी केलेल्या सर्ज ऑपरेशनदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्य दलानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काही दहशतवादी घरांमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवान-पोलिसांनी हे सर्ज ऑपरेशन सुरू केलं होतं.
Jammu and Kashmir: An encounter broke out between terrorists and security forces in Nawakadal area of Srinagar on the intervening night of 18-19 May. Mobile internet services have been snapped in Srinagar. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Sg9DEO7t8C
हिसबुलचा मोठा दहशतवादी श्रीनगरमध्ये लपून बसल्याचं समजल्यानंतर पोलीस आणि जवानांनी सर्ज ऑपरेशन सुरू केल्यानंतर घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. याआधी रविवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहिर अहमद भटला ठार करण्यात आलं होतं. 11 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या रियाज नायकू नंतरची ही दुसरी मोठी चकमकी होती.
16 मे रोजी रात्री डोडा इथल्या खोत्रा गावात सुरक्षा दलाला ताहिर लपून बसल्याची माहिती मिळाली. जानेवारीपासून ताहिर हिजबुलचं संघटन करत असल्याची माहिती मिळाली होती. रविवारी सकाळी सातच्या सुमारास घराच्या आत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर 5 तासांच्या चकमकीनंतर ताहिरचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं. रात्री उशिरा झालेली श्रीनगरमधील ही दुसरी मोठी चकमक असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये हिजबुलचा आणखीन एक मोठ्या दहशतवाद्याला घेरण्यात आलं आहे.