Srilanka : कोलंबोसह 5 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 160 जणांचा मृत्यू

Srilanka : कोलंबोसह 5 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 160 जणांचा मृत्यू

इस्टर संडेला 5 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यात चर्च, मार्केट आणि हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत.

  • Share this:

कोलंबो, 21 एप्रिल : श्रीलंकेची राजधीनी कोलंबोसह देशभरात बॉम्बस्फोट झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इस्टर संड़ेच्या दिवशी चर्चवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाला असून 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्टर संडेच्या पवित्र दिनीच चर्चवर हल्ला करण्यात आला. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही हल्ला झाल्याची माहिती समजते.कोलंबोतील शांगरी ला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. बॉम्बस्फोटानंतर लोकांनी ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये सेंट अँथनी चर्चमध्ये स्फोटानंतरची दृश्ये मन विचलित करणारी आहेत. यात जमिनीवर ढिगारा पडला असून त्याखाली लोक सापडले आहेत.

दरम्यान, यात भारतीय नागरिक आहेत का? याची माहिती घेतली जात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. कोलंबोतील उच्चायुक्तालयाशीसुद्धा भारत संपर्कात आहे.

कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट; स्फोटाचा भीषणता सांगणार VIDEO समोर

First published: April 21, 2019, 10:11 AM IST

ताज्या बातम्या