S M L

Photo : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट 99 जणांचा मृत्यू, हल्ल्यामागे ISI?

कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 450 जण जखमी झाले तर 25 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 11:30 AM IST

Photo : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट 99 जणांचा मृत्यू, हल्ल्यामागे ISI?

कोलंबो, 21 एप्रिल : जगभरात ईस्टर संडे साजरा केला जात असताना श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. आतापर्यंत 8 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 99 जणांचा मृत्यू तर 450 हून अधिक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे ISIचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



Loading...

ईस्टर संडेच्या पवित्र दिनीच चर्चवर हल्ला करण्यात आला. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही हल्ला झाल्याची माहिती समजते.कोलंबोतील शांगरीला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. बॉम्बस्फोटानंतर लोकांनी ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये सेंट अँथनी चर्चमध्ये स्फोटानंतरची दृश्ये मन विचलित करणारी आहेत. यात जमिनीवर ढिगारा पडला असून त्याखाली लोक सापडले आहेत.



दरम्यान, यात भारतीय नागरिक आहेत का? याची माहिती घेतली जात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. कोलंबोतील उच्चायुक्तालयाशीसुद्धा भारत संपर्कात आहे.



कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट; स्फोटाचा भीषणता सांगणार VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 11:05 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close