S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

आरोप-प्रत्यारोप थांबवून प्रदूषणमुक्तीची पाऊलं उचलली पाहिजे-श्री.श्री.रविशंकर

दिल्ली प्रदुषणाचा विषय खूप गंभीर आहे . आपण आरोप प्रत्यारोप थांबवले पाहिजे आणि यासंदर्भात पावलं उचलली पाहिजेत असॆंही ते म्हणाले

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 10, 2017 09:14 AM IST

आरोप-प्रत्यारोप थांबवून प्रदूषणमुक्तीची पाऊलं उचलली पाहिजे-श्री.श्री.रविशंकर

दिल्ली,10 नोव्हेंबर: दिल्लीवर गेले काही दिवस वाढलेल्या प्रदूषणाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. श्री श्री रवीशंकर यांनीही दिल्लीच्या वाढत्या प्रदुषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे . दिल्ली प्रदूषणाचा विषय खूप गंभीर आहे . आपण आरोप प्रत्यारोप थांबवले पाहिजे आणि यासंदर्भात पावलं उचलली पाहिजेत असेही ते म्हणाले .टिव्ही 18 चे एक्झिक्युटिव्ह एडीटर भूपेन चौबे यांनी त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान दिल्लीत प्रदूषणामुळे एक दिवस शाळांना सुट्टी होती. तर दिल्लीतल्या प्रदूषणावर तातडीचा उपाय म्हणून १३ ते १७ नोव्हेंबरच्या दरम्यान दिल्लीत धावणाऱ्या वाहनांसाठी पुन्हा सम-विषम आकड्यांच्या गाड्यांचा निकष लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदूषणाच्या कारणांवर उपाय शोधण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या एक बैठकही झाली.

दिल्लीतल्या प्रदूषणानं धोकादायक पातळी गाठलीय. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पर्यावरण मंत्रालयानं आता उच्चस्तरीय समितीची स्थापना केलीय. दिल्ली तसंच आसपासच्या राज्यांनी प्रदूषणाशी लढा देण्यासाठी कृती योजना राबवावी, असंही पर्यावरण मंत्रालयानं सूचवलंय. याशिवाय तात्पुरता उपाय म्हणून आज दिल्लीच्या रस्त्यांवर, झाडांवर पाणी मारण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत होता.दिल्लीतील २२ सीएनजी केंद्र सर्व क्षमतेने सुरु ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ज्यामुळे सीएनजीच्या गाड्यांना कोणतीही अडचण होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close