News18 Lokmat

कोलंबो बॉम्बस्फोट प्रकरणाचं हे आहे पाकिस्तान कनेक्शन

श्रीलंकेतले बॉम्बस्फोट गुप्तचरांच्या निष्काळजीपणामुळेच घडले असा आरोप एका मंत्र्यांनीच केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 07:31 PM IST

कोलंबो बॉम्बस्फोट प्रकरणाचं हे आहे पाकिस्तान कनेक्शन

कोलंबो 25 एप्रिल : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांबद्दल दररोज नव नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात श्रीलंका पोलिसांनी 9 पाकिस्तानी नागरिकांना अटक केलीय. देशातल्या विविध भागातून या लोकांना अटक करण्यात आली आहे. याच लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांनी साहित्य आणि पैसा पुरविल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व लोकांची वेगवेगळी चौकशी करण्यात येत आहे. श्रीलंकेचे मंत्री लक्ष्मण किरियेल्ला यांनी आपल्याच सुरक्षा संस्थांवर आरोप केले आहेत. भारताने घातपाताची शक्यता असल्याची सूचना दिली होती मात्र गुप्तचर संस्थांनी त्यावर कारवाई केली नाही असंही ते म्हणाले.

या स्फोटाचा तपास एक खास टीम करत असून त्यात अनेक धक्कादाक गोष्टी बाहेर येत आहेत. याच खास पथकाने ही अटकेची कारवाई केली.  कोलंबोतल्या ज्या दोन अलिशान हॉटेलमध्ये स्फोट झाले ते स्फोट दोन भावांनी घडवले असून ते श्रीलंकेतल्या एका मोठ्या कोट्यशीध व्यापाऱ्यांची मुलं असल्याचं वृत्त AFPने दिलं आहे. एका आरोपीच्या बायकोने स्वत:सह आपल्या दोन लहान मुलांनाही बॉम्ब स्फोटाने उडवून दिलं होतं अशी धक्कादायक माहितीही सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

रविवारी ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या विविध आठ आत्मघातकी बॉम्ब स्फोटांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 400 वर पोहोचली आहे. त्यात 34 विदेशी नागरिक होते. तर 500 जण जखमी झाले आहेत.

दोन आत्मघाती हल्लेखोर कोट्यधीश

राजधानी कोलंबोतल्या ज्या दोन अलिशान हॉटेल्समध्ये जे स्फोट झाले ते दोन भावांनी घडवून आणले होते. 18 ते 20 अशा वयांचे ते होते. त्या दोन भावांची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. त्यांच्या वडिलांचा मसाल्याचा मोठा व्यापार असून ते श्रीलंकेतल्या श्रीमंत घराण्यांपैकी एक आहेत. हे दोनही बंधू उच्च शिक्षित होते अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Loading...

चिन्नामोन ग्रँड आणि शांग्रीला या दोन हॉटेलमध्ये या भावांनी खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. त्यापैकी एका भावाने खोट्या नावाने खोली बुक केली होती तर एका भावाने खरं नाव आणि पत्ता लिहीला होता. हे दोघही आत्मघाती हल्लेखोर होते. एकाने हॉटेलच्या जेवणाच्या लॉबित जाऊन तर दुसऱ्या भावाने रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडवून आणले. त्यांनी आपल्या पाठिवरच्या सॅकमध्ये शक्तिशाली स्फोटके दडवून ठेवली होती.

दहशतवाद्याच्या बायकोनेचे केला स्फोट

या आरोपींच्या घराचा माग काढत पोलीस जेव्हा त्यांच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. एका आरोपीच्या बायकोने स्वत:सह आपल्या दोन लहान मुलांनाही बॉम्ब स्फोटाने उडवून दिलं होतं असंही स्पष्ट झालं आहे.

या कुटुंबातच दहशतवाद्यांचं एक युनिट होतं असा दावा पोलिसांनी केलाय. हे कुटुंब कट्टरतावादाकडे का वळलं याचा तपास पोलीस करत आहेत. नॅशनल तौहीद जमात या स्थानिक दहशतवादी संघटनेसोबत यांचे संबंध होते का याचाही तपास सुरू आहे. इस्लामिक स्टेट ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून सुरक्षा दलं त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: sri lanka
First Published: Apr 25, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...