News18 Lokmat

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी 9 पाकिस्तानी नागरिकांना अटक

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 9 पाकिस्तानी नागरिकांनी अटक करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 01:45 PM IST

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी 9 पाकिस्तानी नागरिकांना अटक

कोलंबो, 25 एप्रिल : श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 9 पाकिस्तानी नागरिकांनी अटक करण्यात आली आहे. कोलंबो पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या या नऊ बॉम्बस्फोटात सहभाग होता, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, कोलंबो येथे गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा बॉम्बस्फोट झाला. कोलंबोजवळील पुगोडा शहरात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हे शहर स्फोटांच्या आवाजानं हादरलं आहे. स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण स्फोटाच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, 21 एप्रिलला श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटानं हादरलं  होतं. या  बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या 8 दहशतवादी हल्ल्यात 217हून अधिक निष्पापांचा बळी गेला होता तर 450 जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर लंकेत आणीबाणी लागू करण्यात आली. तर भारताने देखील गोवासह अन्य प्रमुख शहरात अलर्ट जारी होता.

ईस्टर संडेच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोटामुळे हाहाकार

ईस्टर संडेच्या पवित्र दिवशीच चर्चमध्ये स्फोट घडवण्यात आले होते. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला होता. याशिवाय मार्केटमध्येही स्फोट करण्यात आला. कोलंबोतल्या शांगरी ला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले होते. मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश

Loading...

मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. त्यातल्या एका महिलेचं नाव लक्ष्मी असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिली होती. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी श्रीलंकेतल्या सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे.

त्या अतिरेक्याने बहीण आणि पत्नीचाही घेतला जीव

ज्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवले त्यापैकीच एकाने या स्फोटात आपली पत्नी आणि बहिणीचाही बळी दिला. इन्सान सीलावन असं या आत्मघातकी दहशतवाद्याचं नाव आहे. डिमेटोगोडा या कोलंबोच्या उपनगरात ही घटना घडली. कोलंबोच्या साखळी स्फोटांनंतर पोलीस जेव्हा या उपनगरात शोधमोहीम राबवत होते त्यावेळी या दहशतवाद्यानं स्वत:ला पेटवून घेतलं.

हॉटेल्समध्ये स्फोट

कोलंबोच्या 3 फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही स्फोट घडवण्यात आले. शांग्रिला, सिनेमॉन ग्रँड आणि किंग्जबरी या हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर कोलंबोच्या नॅशनल झू जवळ एका हॉटेलमध्ये आणि डिमॅटोगोडामध्ये एका घरातही स्फोट झाला.

दहा दिवसांआधी इशारा

श्रीलंकेच्या पोलीस दलाने दहा दिवस आधीच या आत्मघातकी हल्ल्यांचा इशारा दिला होता. अतिरेकी देशातल्या चर्चेसना लक्ष्य करू शकतात, असंही पोलीस दलाने म्हटलं होतं.

वाचा अन्य बातम्या

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडविणारे दोन भाऊ कोट्यधीश!

श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली, पुन्हा घातपाताची शक्यता!

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

SPECIAL REPORT : वाराणसीत मोदींच्या रॅलीला अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...