श्रीलंकेत संचारबंदीसह सोशल मीडिया वापरावर निर्बंध, बॉम्बस्फोटात 190 जणांचा मृत्यू

श्रीलंकेत संचारबंदीसह सोशल मीडिया वापरावर निर्बंध, बॉम्बस्फोटात 190 जणांचा मृत्यू

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं असून आतापर्यंत 8 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत.

  • Share this:

कोलंबो, 21 एप्रिल: श्रीलंकेची राजधानी कोलंबोसह देशातील अनेक ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत लंकेत 8 बॉम्बस्फोट झाले असून त्यात 190 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 300हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.



कोलंबो शहरात दुपारी झालेल्या शेवटच्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहेत. दरम्यान, या स्फोटांमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समजते. संचारबंदी लागू केल्यानंतर आता सोशल मीडियावर पोस्ट करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.



इस्टर संडेच्या पवित्र दिनीच चर्चवर हल्ला करण्यात आला. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही हल्ला झाल्याची माहिती समजते.कोलंबोतील शांगरी ला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत.





पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. बॉम्बस्फोटानंतर लोकांनी ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये सेंट अँथनी चर्चमध्ये स्फोटानंतरची दृश्ये मन विचलित करणारी आहेत. यात जमिनीवर ढिगारा पडला असून त्याखाली लोक सापडले आहेत.



दरम्यान, यात भारतीय नागरिक आहेत का? याची माहिती घेतली जात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. कोलंबोतील उच्चायुक्तालयाशीसुद्धा भारत संपर्कात आहे.



कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट; स्फोटाचा भीषणता सांगणार VIDEO समोर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 03:15 PM IST

ताज्या बातम्या