ट्रम्प यांनी केली मोठी चूक, म्हणाले श्रीलंकेत 13.8 कोटी ठार झाले!

ट्रम्प यांनी केली मोठी चूक, म्हणाले श्रीलंकेत 13.8 कोटी ठार झाले!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर चर्चेत असतात. रविवारी ट्रम्प यांनी ट्विटवर एक मोठी चूक केली.

  • Share this:

वॉशिंग्टन, 21 एप्रिल: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर चर्चेत असतात. रविवारी ट्रम्प यांनी ट्विटवर एक मोठी चूक केली. एकापाठोपाठ एक झालेल्या साखळी बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्यामुळे रविवार संपूर्ण श्रीलंका हादरला. या हल्ल्याचा निषेध जगभरातील अनेक नेत्यांनी केला. यात डोनाल्ड ट्रम्पचा समावेश देखील होता. पण लंकेत ठार झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहताना आणि हल्ल्याचा निषेध करताना ट्रम्प यांनी मोठी चूक केली.

गेल्या दशकभरातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला श्रीलंकेत रविवारी झाला. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी लंकेतील नागरिकांबद्दल संवेदना व्यक्त करणारा ट्विट केला. तसेच अमेरिकेकडून मदत करण्याची घोषणा देखील केली. त्यांनी ट्विटमध्ये 3 चर्च आणि ३ हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 138 लोकांच्या मृत्यू ऐवजी 13.8 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचे लिहिले. ट्रम्प यांचा हा ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. त्यांनी तब्बल २० मिनिटांनी हा ट्विट डिलीट केला. पण तोपर्यंत ट्रम्प यांनी केलेली चूक जगभरात पोहोचली होती आणि लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ट्रम्प यांच्या या ट्विटवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले. ते म्हणतात, मृतांच्या संख्येत तुम्ही वाढ करू शकता. पण प्रत्येक गोष्ट लाखात मोजली जात नाही. याशिवाय अनेक युझर्सनी ट्रम्प यांना ट्विट करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

श्रीलंकेतील एका युझरने ट्विटवर लिहले आहे की, आमची लोकसंख्या दोन कोटी आहे. 13.8 कोटी ही संख्या अशक्य आहे. तुमची अनावश्यक संवेदना तुमच्या जवळच ठेवा. आम्हाला त्याची गरज नाही. लंकेची एकूण लोकसंख्या 2.17 कोटी आहे. अर्थात ट्विटवर चूक करण्याची ट्रम्प यांची ही पहिली वेळ नाही. याआधी अशा पद्धतीचे चुकीचे ट्विटकरून नंतर ते डिलीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

First published: April 21, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading