धक्कादायक! BSF जवानाकडून अधिकाऱ्याची हत्या आणि नंतर स्वत: गोळी घालून केली आत्महत्या

धक्कादायक! BSF जवानाकडून अधिकाऱ्याची हत्या आणि नंतर स्वत: गोळी घालून केली आत्महत्या

BSF जवान आणि SI यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद टोकाला गेला आणि हवालदारानं अधिकाऱ्याला गोळी घातली.

  • Share this:

श्रीगंगानगर, 03 मे : भारत-पाकिस्तान सीमारेषेवर भारतीय सुरक्षा दलातील जवानांमध्ये वाद झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. BSF जवान आणि SI यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद टोकाला गेला आणि हवालदारानं अधिकाऱ्याला गोळी घातली. त्यानंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. गोळी लागल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

रेणुका पोस्ट इथे तैनात असलेल्या BSFच्या 125 व्या बटालियनचे हवालदार शिवचंद्र राम आपलं कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडला. रविवारी सकाळी शिवचंद्र राम आणि SI रणवेंद्र पाल यांच्यातील वाद उफाळून आला. हा वाद टोकाला गेल्यानं हवालदारानं अधिकाऱ्यावर रायफलमधून गोळ्या घातल्या आणि त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. हवालदार राम यांना गेट उघडण्यासाठी पाल यांनी सांगितलं होतं. गेट उघडायला उशीर झाल्यानं त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.

हे वाचा-पुण्यात दारूची दुकानं, सलून सुरू होतील का? पालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

गेट उघडण्यास थोडा उशीर झाला, ज्यावरून एसआय आणि हवालदार यांच्यात वाद झाला. ड्युटीवर तैनात असलेल्या बीएसएफच्या या दोन जवानांमधील हाणामारी इतकी वाढली की हवालदार शिवचंद्र संतप्त झाले आणि एसआयला रायफलने गोळी घातली. गोळी लागून एसआयचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर हवालदारानं स्वत: ला गोळी घालून संपवलं आहे. बीएसएफ अधिकाऱ्यांना मिळताच माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या बीएसएफ अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मृत एसआय रणवेंद्र पाल सिंह हे उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादचे. हवालदार शिवचंद्र राम हजारीबाग झारखंडचे. सध्या बीएसएफ पोलिसांनी कारवाई करत दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

हे वाचा-Alert! देशात नव्या पद्धतीने होतोय सायबर घोटाळा, वाचण्यासाठी हे लक्षात ठेवा

First published: May 3, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या