वीज कोसळल्यामुळे 15 खेळाडू जखमी, खुल्या मैदानात करत होते सराव

भारत आणि वेस्ट इंडिज यांचा दुसरा टी - 20 सामनाही खराब हवामान आणि वीज पडण्याच्या धोक्यामुळेच थांबवण्यात आला होता. अमेरिकेत फ्लोरिडामध्ये या सामन्याच्या वेळी आकाशात काळे ढग जमू लागले. जोरदार वाराही होता आणि विजा चमकत होत्या. यामुळे खेळाडूंना मैदानातून बाहेर काढलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 07:55 PM IST

वीज कोसळल्यामुळे 15 खेळाडू जखमी, खुल्या मैदानात करत होते सराव

रोसेनफेल्ड (जर्मनी), 10 ऑगस्ट : पावसाळ्यात आपल्याकडे वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच ढगांचा गडगडाट आणि विजांसह पाऊस कोसळत असेल तर खबरदारी घ्यावी लागते. दक्षिण जर्मनीमध्ये एका मैदानात वीज पडल्यामुळे तिथे सराव करणारे खेळाडू जखमी झाले. वीज पडल्याने जखमी झालेल्या 15 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रोसेनफेल्ड - हेइलिगेनजिम्मेर्न मैदानावर हे खेळाडू सराव करत होते.या खेळाडूंच्या जीवाला कोणताही धोका नाही पण तरीही त्यांना तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Video:कमाल! पायलट बनायचं होतं म्हणून टाटा नॅनोचं बनवलं हेलिकॉप्टर

भारताचा सामनाही झाला होता रद्द

भारत आणि वेस्ट इंडिज यांचा दुसरा टी - 20 सामनाही खराब हवामान आणि वीज पडण्याच्या धोक्यामुळेच थांबवण्यात आला होता. अमेरिकेत फ्लोरिडामध्ये या सामन्याच्या वेळी आकाशात काळे ढग जमू लागले. जोरदार वाराही होता आणि विजा चमकत होत्या. यामुळे खेळाडूंना मैदानातून बाहेर काढलं. स्टेडियममधल्या प्रेक्षाकांनीही मैदान सोडून जायला सांगण्यात आलं.

अमेरिकेत फ्लोरिडामध्ये, विजा कोसळायचा धोका असेल तर सामने थांबवावे लागतात. हे सामने शालेय स्तरावरचे असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. सगळ्या सामन्यांसाठी सारखेच नियम आहेत.

Loading...

Success Story:अपंगत्वावर मात करत सौम्याने UPSC मध्ये मिळवलं यश

युरोपमधल्या काही देशांमध्येही विजा कोसळून अपघात होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळेच तिथे वीज पडण्याबदद्लचे अलर्ट जारी केले जातात.

युरोपमधल्याच लक्झेमबर्ग देशात विजांच्या कडकडाटासह वादळ आलं आहे. त्यामुळे काही जण जखमी आहेत. नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅममध्येही वादळ आल्याची खबर आहे.

==================================================================================================

SPECIAL REPORT : NDRF चे जवान ठरले देवदूत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...