VIDEO राज्यवर्धन यांचं नवं चॅलेंज, विचारली 5 मिनिटं खेळण्याची गोष्ट

VIDEO राज्यवर्धन यांचं नवं चॅलेंज, विचारली 5 मिनिटं खेळण्याची गोष्ट

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी बुधवारी एका नवीन अभिनयाची सुरुवात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ०९ जानेवारी २०१९- केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी बुधवारी एका नवीन अभिनयाची सुरुवात केली आहे. त्यांनी खेलो इंडिया अभियानाला अधिक सशक्त करण्यासाठी #5MinuteAur चॅलेंजची सुरुवात केली. या नव्या कॅम्पेनची सुरुवात करताना त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये राज्यवर्धन टेबल टेनिस खेळताना दिसत आहेत. क्रीडा मंत्र्यांचा हा व्हिडिओ अगदी कमी वेळेत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमार्फत राज्यवर्धन यांनी लोकांना फक्त ५ मिनिटं खेळण्याचं आव्हान केलं आहे. तसेच त्यांनी लोकांकडे त्यांची ५ मिनिटं खेळण्याची कथा शेअर करण्याचं आवाहनदेखील केलं आहे.

त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, ‘आपल्याला युवा अथलीट्सचा आवाज व्हावं लागेल. जोरात बोला ५ मिनिटं आणखीन खेळ भारत. अजून खेळलो तर अजून जिंकू.’ राज्यवर्धन हे स्वतः खेळाडू होते. त्यांना देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदकही मिळवले आहे.

क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांनी याआधीही देशातील नागरिकांना तंदुरुस्त राहण्याचं महत्त्व पटावं यासाठी ‘हम फिट तो इंडिया फिट’सारखी मोहीम राबवली होती.

#HumFitTohIndiaFit या ट्विट हँडवरुन फिटनेस चॅलेंज चालवण्यात आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला फिटनेस व्हिडिओ शेअर केला होता. राज्यवर्धन राठोड यांनीही ऑफिसमध्ये पुशअप मारताचा व्हिडिओ शेअर केला होता. या चॅलेंजसाठी लोकांना व्यायाम करतानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

VIDEO : शिवसेनेला युती नको असेल तर आमची स्वबळाची तयारी! - गिरीश महाजन

First published: January 9, 2019, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading