इंदौर, 13 मार्च : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (spiritual guru bhaiyyu maharaj) आत्महत्या प्रकरणात शुक्रवारी 12 मार्च रोजी महाराजांचा ड्रायव्हर आणि सेवेकरी असलेल्या कैलाश पाटील याची फेरचौकशी करण्यात आली. bhaiyyu maharaj news
महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावलेली होती असं वक्तव्य करत त्यानं खळबळ उडवून दिली. त्याच्या मते, यामाध्यमातून याबाबत माहिती मिळवली जायची गाडी कुठं-कुठं जात असे. महाराजांची पत्नी आयुषी गाडीत महाराजांसोबत जाणाऱ्या सेवेकऱ्याला पुन्हा-पुन्हा एकाच गोष्ट विचारत असे, की त्यांच्यासोबत कोण-कोण आहे. (bhaiyyu maharaj suicide case news)
12 मार्च रोजी फिर्यादीच्या वकिलांनी कैलाशचा दुसऱ्यांदा जबाब घेण्यासाठी त्याला बोलावण्याची मागणी केली. या प्रकरणात आता 15 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी महाराजांचा सेवेकरी शेखर यालाही बोलावलं गेलं आहे. (bhaiyyu maharaj driver kailash patil in court)
या प्रकरणात आतापर्यंत 25 हुन अधिक साक्षीदारांच्या साक्षी घेऊन झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातून सहा महिन्यात सुनावणी संपवण्याचा आदेश आलेला आहे. यानंतर सुनावणीला वेग आलेला आहे. शुक्रवारी महाराजांचा ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या कैलाशनं न्यायालयाला सांगितलं, की आयुषी आणि कुहूमध्ये सतत भांडणं होत असायची. यामुळं महाराज तणावात असायचे. आरोपी विनायक आणि शरद हे महाराजांचे विश्वासू सेवेकरी होते. घटनेच्या तीन महिने आधी महाराजांनी मला कुहूची गाडी चालवण्यासाठी पुण्याला पाठवलं होतं. (gprs system in bhaiyyu maharaj car)
कैलाशनं प्रतिचौकशीत हेसुद्धा सांगितलं, की सानिया सिंह नावाची एक मॉडेल आणि अभिनेत्री महाराजांना भेटायला इंदौरला येत असे. तिचं जेवण महाराजांकडे लपूनछपून पाठवलं जायचं. महाराजांच्या गाडीवर जीपीआरएस ट्रॅकर लावलेले होते. गाडीच्या लोकेशनवर नजर ठेवली जायची. महाराजांची पत्नी त्यांच्यासोबत असलेल्या सेवेकऱ्यांना सतत फोन करून विचारायची, की सोबत कोण-कोण आहे. कैलाश यांनी कोर्टाला हेसुद्धा सांगितलं, की महाराष्ट्राच्या एका संस्थेवर लोकांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होता. (bhaiyyu maharaj court case driver news)
हेही वाचा आणखी एका राज्यात आरक्षणाबाबत मोठा निर्णय; 75 टक्के नोकऱ्या फक्त भूमिपुत्रांना
या सगळ्यामागे असलेल्या वर्षा नावाच्या महिलेनं मुलताईमध्ये कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली होती. महाराजांच्या काही जवळच्या लोकांनी हा सौदा केला होता. फिर्यादीच्या बाजूनं बाजू मांडत असलेले वकील गाजराजसिंह सोळंकी यांनी सांगितलं, की दुसऱ्यांदा प्रतीचौकशी करताना कैलाश पाटील यानं ही गोष्ट कबूल केली, की त्यानं पोलिस एमआयजीद्वारे कोठडीत ठेवलं गेल्याची काहीच तक्रार केली नव्हती. आम्ही या साक्षीदाराची गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं सादर करण्याची कोर्टाकडे मागणी केली आहे. या प्रकरणातील पुढची सुनावणी 15 मार्च रोजी होईल.
हेही वाचा बाळ बोठेच्या अटकेनंतर रेखा जरे हत्येप्रकरणी नवा ट्विस्ट,या कारणामुळे दिली सुपारी
हे आहे प्रकरण
भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. महाराजांचे तीन सेवेकरी विनायक, पलक आणि शरदला पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपींच्या बाजूनं ज्येष्ठ वकील अविनाश सिरपूरकर, वकील धर्मेद्र गुर्जर आणि वकील आशीष चौरे बाजू मांडत आहेत. फिर्यादीची बाजू सरकारी वकील विमल मिश्रा आणि एजीपी गजराजसिंह सोळंकी मांडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indore News, Suicide case