मराठी बातम्या /बातम्या /देश /IndiGo नंतर आता SpiceJet ने केले शुल्क माफ; विमान प्रवाशांना मिळणार ‘हा’ फायदा

IndiGo नंतर आता SpiceJet ने केले शुल्क माफ; विमान प्रवाशांना मिळणार ‘हा’ फायदा

देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगो (Indigo Airlines) नंतर आता बजेट एअरलाइन्स कंपनी स्पाइसजेट (spicejet flight), प्रवाशांकडून पाच दिवसांपूर्वीच्या तिकिटांच्या तारखांमध्ये किंवा वेळेत बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क (Change Fees) आकारणार नाही.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 18 एप्रिल: देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगो (Indigo Airlines) नंतर आता बजेट एअरलाइन्स कंपनी स्पाइसजेट (spicejet flight), प्रवाशांकडून पाच दिवसांपूर्वीच्या तिकिटांच्या तारखांमध्ये किंवा वेळेत बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क (Change Fees) आकारणार नाही. यापूर्वी ही सूट किमान 7 दिवसांपूर्वी झालेल्या फेरबदलासाठी होती. मात्र, आता आणखी दोन दिवस वाढवण्यात आले आहेत.

स्पाइसजेटकडून शनिवारी सांगण्यात आले की, नवीन ऑफर अंतर्गत 17 एप्रिल ते 10 मे दरम्यान प्रवासी उड्डाणांसाठी तिकिट बुक करणार्‍या प्रवाशांना एकवेळ बदल शुल्कात सूट मिळू शकते. याद्वारे तारीख आणि वेळेत फक्त एकदाच बदल करता येतो.

महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये कोरोना स्थिती (Corona in India) बिकट आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असल्याने स्थानिक सरकारांनी संचारबंदी, टाळेबंदी असे निर्बंध लावले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांवर तिकीट रद्द करण्याची वेळ येऊ नये. तिकीट रद्द करण्याऐवजी त्यांच्याकडे तारीख आणि वेळेत बदल करण्याचा पर्याय असावा, हा या बदलामागील उद्देश आहे.

इंडिगोने अगोदरच दिली होती सूट

याआधी शुक्रवारी इंडिगोने सांगितले होते की, देशांतर्गत (डोमेस्टिक फ्लाइट) तिकिटांसाठी वेळ किंवा तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारणारले जाणार नाही. कंपनी 17 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत बुकिंगमध्ये बदल केल्यास कोणतेही शुल्क घेणार नाही. देशात विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून काही राज्यांनी टाळेबंदी लावल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. प्रवासी आता 30 एप्रिल 2021 पर्यंत नियमित बुकिंगमध्ये कितीही वेळा बदल करू शकणार आहेत.

देशातील कोरोना स्थिती गंभीर झाल्याने केंद्र सरकारसह राज्य सरकारांवर काही निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. या निर्बंधांचा विमानसेवेला फटका बसत आहे.

हे वाचा - ‘बिनकामाचा मुख्यमंत्री’; आपली माणसं गमावल्यानं भाजप नेत्यानंच केली शिवराज सिंहांविरोधात पोस्ट

First published:
top videos

    Tags: Airplane, Airport, Corona updates