Elec-widget

स्पाइसजेटच्या तंत्रज्ञाचा मृत्यू, या एअरपोर्टवर घडली दुर्घटना

स्पाइसजेटच्या तंत्रज्ञाचा मृत्यू, या एअरपोर्टवर घडली दुर्घटना

स्पाइसजेटच्या एका तंत्रज्ञाचा विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये अडकल्याने मृत्यू ओढवला. या विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडली. कोलकात्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवर हा अपघात झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जुलै : स्पाइसजेटच्या एका तंत्रज्ञाचा विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये अडकल्याने मृत्यू ओढवला. या विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडली. कोलकात्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवर हा अपघात झाला.

विमानाचा लँडिंगचा दरवाजा अचानक बंद झाल्यामुळे हा तंत्रज्ञ आतमध्येच अडकला. पहाटे पावणेदोनच्या सुमाराला ही घटना घडली. रोहित पांडे असं या तंत्रज्ञाचं नाव आहे. तो अवघ्या 26 वर्षांचा होता.

रोहित पांडे या तंत्रज्ञाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू ओढवला असून याबद्दल आम्हाला तीव्र दु:ख आहे, असं स्पाइसजेटने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. एअरपोर्टवर पार्क असलेल्या या विमानामध्ये दुरुस्तीचं काम सुरू असताना हा अपघात घडला, असंही स्पाइसजेटने नमूद केलं आहे.

रोहित पांडे हा तंत्रज्ञ विमानाच्या खालच्या भागात अडकला. हायड्रॉलिक प्रेशरमुळे ही घटना घडली असावी, असं प्राथमिक अहवालात म्हटलं आहे.

रेल्वेमध्ये आहेत 500हून जास्त व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज

Loading...

कंपनीला पाठवली होती नोटीस

एअरपोर्टचे अधिकारी आणि पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. दरम्यान, एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल अनैसर्गिक मृत्यू झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जिथे घटना घडली तिथे वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत. ही तांत्रिक चूक होती की कुणी घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला याची पोलीस चौकशी करत आहेत.

गेल्याच आठवड्यामध्ये स्पाइसजेट एअरलाइनला एक नोटीस पाठवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा दर्जा खालावला असल्याचं या नोटिशीत म्हटलं होतं.

त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे स्पाइसजेट एअरलाइन अडचणीत आली आहे.

=======================================================================

SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...