दोन वेळा प्रयत्न करून लँड झालं नाही विमान; गोव्यात उतरताना Spice Jet चा अपघात थोडक्यात टळला

दोन वेळा प्रयत्न करून लँड झालं नाही विमान; गोव्यात उतरताना Spice Jet चा अपघात थोडक्यात टळला

स्पाइस जेट कंपनीचं विमान लँडिंग गिअरशिवाय धावपट्टीवर उतरणार होतं. पण...

  • Share this:

पणजी, 17 डिसेंबर : गोव्याच्या विमानतळावर एक मोठी दुर्घटना नौदलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या सतर्कतेमुळे टळली. स्पाइस जेट कंपनीचं विमान लँडिंग गिअरशिवाय धावपट्टीवर उतरणार होतं. पण नौदलाच्या विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने (Navy ATS)ही चूक वैमानिकाच्या लक्षात आणून दिली. अगदी आयत्या वेळी पायलटला लँडिंग न करता गो अराउंडचा इशारा देण्यात आला.

दुसऱ्या वेळी पुन्हा एकदा लँड होण्याआधी लँडिंग गिअर व्यवस्थित उघडली नाहीत. त्यामुळे विमानाचं लँडिंग पुढे ढकलण्यात आलं. पुन्हा स्पाइस जेटचं हे विमान आकाशात घिरट्या घालू लागलं. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात लँडिंग गिअरनी थोडी साथ दिली आणि विमान एकदाचं गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालं.

नेव्ही ATS ने दिलेल्या माहितीनुसार, सुरतहून गोव्याकडे येणारं स्पाइस जेटचं विमान अयोग्य रीतीने लँड होतंय हे रमेश टिग्गा या रनवे कंट्रोलरच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने वरीष्ठांना निरोप दिला. वैमानिकाला तत्काळ संदेश पोहोचवण्यात आला आणि विमान उतरण्याआधी काही क्षण अगोदर दिशा बदलून आकाशात घिरट्या घालू लागलं.

असं दोन वेळा झालं. तिसऱ्यांदा विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं क्षणभर जरी दुर्लक्ष झालं असतं, तरी प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला असता.

अन्य बातम्या

नाशिकमध्ये फक्त 'या' दोघांच्या नावाची चर्चा, वाचून तुम्हीही म्हणाल लयभारी!

जामिया आंदोलकांबाबत दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा!

ना महामार्ग ना सावित्री पूल, गडकरींचं आश्वासन हवेत विरलं!

'शिवसेनेची आता सोनियासेना झाली आहे', भाजप नेत्याचा तिखट हल्ला

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 17, 2019, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading