एका स्पेलिंगच्या चुकीमुळे 8000 कोटी चुकवून पसार झाला असता हा उद्योगपती

आडनावात केलेल्या स्पेलिंग मिस्टेकमुळे नरेश गोयल यांना परदेशात जाता आलं असतं.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 03:43 PM IST

एका स्पेलिंगच्या चुकीमुळे 8000 कोटी चुकवून पसार झाला असता हा उद्योगपती

नवी दिल्ली, 30 मे : जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी देश सोडून पळून जाण्यास यशस्वी झाले असते. त्यांच्या नावात केलेला बदल हा त्यांच्या पथ्यावर पडला असता. पण, सतर्कतेमुळे मात्र नरेश गोयल यांच्या संपूर्ण प्लॅनवर पाणी फेरलं. त्यानंतर विमान थांबवून त्यांना उतरवलं गेलं. मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेअर्सच्या वतीनं नरेश गोयल यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पण, आडनावातील स्पेलिंगमध्ये केलेल्या बदलामुळे त्यांना परदेशात पसार होता आलं असतं.

Goel ऐवजी Goyal

लुक आऊट नोटीसनुसार नरेश गोयल यांच्या नावाची स्पेलिंग Goel आहे. पण, त्याऐवजी Goyal अशी स्पेलिंग करण्यात आली. आडनावाच्या स्पेलिंगमध्ये केलेल्या बदलामुळे त्यांना इमिग्रेशन काऊंटरवरून सोडण्यात आलं असतं. पण, सतर्कतेमुळे मात्र गोयल यांचा प्लॅन फसला.


मोदींचं नवं मंत्रिमंडळ अखेर ठरलं, 3 मराठी नावांसह 'या' नेत्यांना मिळणार संधी

Loading...

विमान थांबवलं गेलं

नरेश गोयल आपल्या पत्नीसह दुबईकरता रवाना होणार होते. पण, इमिग्रेशन काऊंटरवर पुन्हा एकदा चौकशी केल्यानंतर नरेश गोयल यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस बजावलं गेल्याचं लक्षात आलं. त्यानंतर विमान थांबवत नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीला उतरवलं गेले. त्यावेळी विमानाला जवळपास तासाभराचा उशिर झाला होता.

जेट एअरवेज कंपनीवर 8400 कोटींचं कर्ज आहे. शिवाय, 18 एप्रिलपासून कंपनीची सेवा देखील बंद आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. त्यांना देश सोडण्यास बंदी आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार थकले

ज्या कंपनीच्या एअरलाइनने हजारो प्रवासी टेक ऑफ घ्यायचे त्याच एअरलाइनच्या कंपनीच्या मालकांवर परदेश प्रवास रोखण्याची कारवाई होणं हे दुर्दैवी आहे, असं बोललं जात आहे. जेट एअरवेज कर्जाच्या खाईत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. अशा स्थितीत नरेश गोयल हे मात्र परदेशात जाणार होते. मात्र त्यांना प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली.


VIDEO: चंद्रपूर, अमरावतीत उष्णतेची लाट, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडींचा आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...