Home /News /national /

सुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

सुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

Accident Video: एक युवकानं सुसाट वेगानं दुचाकी चालवत आगारातून बाहेर निघणाऱ्या बसला जोरात धडकी मारली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    सुरत, 17 मे:  महाराष्ट्रातील प्रत्येक रस्त्यावर 'अति घाई संकटात नेई' असा संदेश लिहिलेला किमान एकतरी फलक आढळतो. असे फलक वाहन चालकांना गाडी चालवत असताना नेहमी भानावर यायला मदत करतात. पण काहीजणांना वेगानं गाडी चालवण्याची भलतीचं हौस असते. याची शिक्षा त्यांना कधी ना कधी नक्की मिळते. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक युवक सुसाट वेगानं दुचाकी चालवत आहे. यावेळी त्यानं आगारातून बाहेर निघणाऱ्या बसला जोरात टक्कर मारली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संबंधित घटना गुजरातच्या सुरत शहरातील उद्योग विहार येथील आहे. याठिकाणी एका युवकानं दुचाकीवरून वेगानं येत बसला धडक मारली आहे. अपघातग्रस्त बस आगारातून बाहेर निघत होती, त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, संबंधित युवक सुसाट वेगानं येऊन बसला धडकला आहे. बसला धडक मारल्यानंतर दुचाकी बसखाली अडकली तर संबंधित तरुण रस्त्यावर पडला आहे. दुचाकीस्वारानं बसला धडक दिल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना देत जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. हे ही वाचा-Car मध्ये सॅनिटायझर वापरताना लागली आग; 'बर्निंग कार'चा थरार VIDEO मध्ये कैद विशेष म्हणजे, सुरतमध्ये यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये काही बाईकस्वारांना आपला जीवही गमवावा लागला आहे. वारंवार याठिकाणी अपघात होतं असूनही चालक योग्य ती काळजी घेताना दिसत नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bike accident, Gujrat, Viral video.

    पुढील बातम्या