मराठी बातम्या /बातम्या /देश /

भोपाळमध्ये दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीत शिरली भरधाव कार; दोघांना चिरडले, भीषण अपघाताचा LIVE VIDEO

भोपाळमध्ये दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीत शिरली भरधाव कार; दोघांना चिरडले, भीषण अपघाताचा LIVE VIDEO

विसर्जन मिरवणुकीत शिरली भरधाव कार; दोघांना चिरडले, भीषण अपघाताचा LIVE VIDEO

विसर्जन मिरवणुकीत शिरली भरधाव कार; दोघांना चिरडले, भीषण अपघाताचा LIVE VIDEO

speeding car hits people in immersion procession: विसर्जन मिरवणुकीत भारधावकारने दोघांना चिरडल्याचा LIVE VIDEO आला समोर.

  • Published by:  Sunil Desale
भोपाळ, 17 ऑक्टोबर : दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत (Durga Mata immersion procession) एक भरधाव कार शिरल्याचा (speeding car enter in immersion procession) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोपाळमध्ये (Bhopal) शनिवारी दुर्गा मातेची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. भरधाव कार मिरवणुकीत शिरल्याने दोघे जण चिरडले गेले. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला पण आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मिरवणुकीत कार शिरल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. शनिवारी रात्री 11.15 वाजता ही घटना घडली. भोपाळमधील बजरिया परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर भाविक चांगलेच संतापले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दसऱ्याच्या दिवशी रायपूरमध्येही घडला असाच प्रकार विसर्जन मिरवणुकीत गांजा भरलेली एक कार घुसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमध्ये दसऱ्याच्या दिवशी घडली. काही नशेबाजांनी गांजानं भरलेली ही कार तुफान वेगात गर्दीत घुसवली आणि गर्दीतील माणसं अक्षरशः उडून बाजूला पडली. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचाणा व्हिडिओ समोर आला असून हा प्रकार कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवणार आहे. छत्तीसगडमधील जशपूरमध्ये दूर्गेची विसर्जन मिरवणूक सुरू होती. अनेक लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पाठिमागून प्रचंड वेगात एक कार आली आणि थेट गर्दीत घुसली. गर्दीतील माणसांना उडवत आणि चिरडत ही कार पुढे गेली. काहीजण या धक्क्यानं लांब उडाले, काहीजण ढकलले गेले तर काहीजण गाडीखाली सापडले. गाडीच्या चाकाखाली सापडलेल्या माणसांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. या कारचा वेग 100 पेक्षाही जास्त असल्याची माहिती आहे. रस्त्याने चालणाऱ्या माणसांच्या अंगावर ही गाडी आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. नागरिकांच्या किंकाळ्या आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले. काही समजायच्या आतच लोकांचे प्राण गेले होते. जे वाचले त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी कारवर हल्लाबोल करत कारला आग लावली.
First published:

Tags: Accident, Bhopal News, Shocking viral video

पुढील बातम्या