नवी दिल्ली, 13 मार्च: केंद्रातील मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. देशात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने अनेक प्रयत्न केले तरी देखील त्यांनी अपेक्षित यश मिळाले नाही. जाणून घेऊयात गेल्या पाच वर्षात मोदी सरकारची शेअर बाजारातील कामगिरी...
हे देखील वाचा- मनमोहन ते मोदी : दोन निवडणुकांमध्ये तुमच्या आयुष्यात किती फरक पडला
मोदी सरकारच्या कार्यकाळात मुंबई शेअर बाजारात 48 टक्क्यांची वाढ झाली. याउटल मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात (2009-14) ही वाढ 180 टक्के इतकी होती. तर पहिल्या कार्यकाळात (2004-2009) या कार्यकाळात सेन्सेक्समधील वाढ 78 टक्के इतकी होती. यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे युपीए-2च्या कार्यकाळातील वाढ ही त्या सरकारच्या अखेरच्या कार्यकाळात म्हणजेच 13 सप्टेंबर 2013 ते मे 2014 या काळातील होती. या नऊ महिन्याच्या कार्यकाळात सेन्सेक्स 25 टक्क्यांनी वाढला होता.
मे 2014मध्ये मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेअर बाजारामधील परिस्थितीत चांगली होती. निफ्टी देखील तेजीत होता. पण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी खराब कामगिरी केल्यामुळे दलला स्ट्रीटला झटका बसला. जीडीपी दर वाढण्यासाठी सेवा क्षेत्रावर जास्त विश्वास ठेवला गेला. मात्र या क्षेत्राला चांगली कामगिरी करता आली नाही.
मोदींना का यश मिळाले नाही
नोटबंदी जर योग्य प्रकारे लागू केली गेली नाही. त्याचा थेट परिणाम जीडीपीवर झाला. हीच अवस्था जीएसटीबाबत झाली. या दोन्ही गोष्टींमुळे अर्थव्यवस्था आता कुठे सावरत आहे आणि येत्या काही काळात अर्थव्यवस्था वेग पकडेल असा विश्वास शेअर बाजारातील तज्ञांनी व्यक्त केला.
VIDEO : कार्यकर्ते म्हणाले, 'पार्थला जिंकून आणू', शरद पवार म्हणतात...