SPECIAL REPORT : पंतप्रधान मोदींचा पत्ता बदलणार? असं आहे सध्याचं निवास्थान!

SPECIAL REPORT : पंतप्रधान मोदींचा पत्ता बदलणार? असं आहे सध्याचं निवास्थान!

पंतप्रधानांचं सध्याचं निवासस्थान ७ लोक कल्याण मार्ग हे संकुल एकूण १२ एकर जागेवर पसरलंय. या संकुलात १,३,५,७ आणि ९ लोक कल्याण मार्ग असे एकूण ५ बंगले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : येत्या काही वर्षात भारताच्या पंतप्रधानांचा पत्ता बदलू शकतो. सरकारनं नेमलेल्या एका संस्थेनंच हा प्रस्ताव दिला आहे. पाहूयात कुठे असेल पंतप्रधानांचं नवं निवासस्थान?

भारताच्या पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणजे सत्तेचं केंद्र. त्यामुळे कायमच त्याच्याभोवती वलय आणि कुतूहल. सध्या पंतप्रधानांचं निवासस्थान ७, लोक कल्याण मार्ग इथं आहे ज्याला आधी रेस कोर्स रोड म्हणायचे.. पण लवकरच पंतप्रधानांचा पत्ता बदलू शकतो. एचसीपी डिझाईन या कंपनीनं तसं सरकारला सुचवलं आहे. पंतप्रधानांचं नवं निवासस्थान हे राष्ट्रपती भवनाच्या शेजारी, राजपथावरच हे निवासस्थान असावं, असं या कंपनीनं सुचवलं आहे.

यावर सरकारकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पंतप्रधानांचं सध्याचं निवासस्थान ७ लोक कल्याण मार्ग हे संकुल एकूण १२ एकर जागेवर पसरलंय. या संकुलात १,३,५,७ आणि ९ लोक कल्याण मार्ग असे एकूण ५ बंगले आहेत. यापैकी ५, लोक कल्याण मार्गमध्ये पंतप्रधान मोदी राहतात. तर ७ नंबरच्या बंगल्यात त्यांचं कार्यालय आहे. ३ नंबरच्या बंगल्यात मोठी कॉन्फरन्स रूम आहे.

१ नंबरच्या बंगल्यात हेलिपॅड आहे. तर ९ नंबरचा बंगल्यात एसपीजीचं मोठं कार्यालय आहे. याच बंगल्यातून थेट सफदरजंग विमानतळापर्यंत भुयारी मार्ग आहे. बंगल्याला एकच प्रवेशद्वार आहे, जिथे एसपीजीचा २४ तास कडक पाहरा असतो. सर्व बंगल्यांच्या काचा अशा आहेत की, रासायनिक आणि जैविक हल्ला झाला तरी आतमधल्या व्यक्ती सुरक्षित राहतील.

पंतप्रधानांना भेटणंही सोपं नसतं. त्यांचे मित्र किंवा नातेवाईकही त्यांना सहज आणि थेट भेटू शकत नाही. आज पंतप्रधानांना भेटण्यास कोण येणार आहे. याची यादी त्यांच्या स्वीय्य सचिवांकडे असते, जी एसपीजीलाही दिली जाते. त्या यादीनुसारस पाहुण्यांना बंगल्यात प्रवेश मिळतो. पाहुण्यांची गाडी थेट पंतप्रधानांच्या बंगल्यापर्यंत नेता येत नाही. गाडी गेटवरच सोडावी लागते, तिथून एसपीजीची विशेष वाहनं तयार असतात. कडक तपासणीनंतरच एसपीजी पाहुण्यांना ५ नंबरच्या बंगल्यापर्यंत घेऊन जातं. पंतप्रधानांना वाढल्या जाणाऱ्या अन्नाचीही आधी तपासणी होते. मग त्यांना ते सर्व्ह केलं जातं. तसंच, ७, लोक कल्याण मार्गावरील आकाश हे नो फ्लाय झोन आहे. म्हणजे कुठल्य़ाही परिस्थितीत त्यावरून विमान जाऊ शकत नाही.

पंतप्रधान मोदींची कशी असते सुरक्षा व्यवस्था?

- मित्र किंवा नातेवाईकही थेट भेटू शकत नाहीत

- पाहुण्याची यादी स्वीय्य सचिवांकडे

- यादी एसपीजीला सुपूर्द केली जाते

- यादीनुसारच पाहुण्यांना बंगल्यात प्रवेश

- पाहुण्यांची गाडी शेवटपर्यंत नेता येत नाही

- एसपीजीच्या विशेष वाहनात बसून जावं लागतं

- पंतप्रधानांच्या अन्नाची कसून तपासणी

- तपासणीनंतरच वाढण्याची परवानगी

- निवासस्थानाचा परिसर कायम नो-फ्लाय झोन

अशी असते पंतप्रधानांची बडदास्त

- ताफ्यात एकूण 6 BMW गाड्या

- 6 पैकी 2 BMW दिल्लीतील वापरासाठी

- 6 पैकी 2 BMW देशांतर्गत दौऱ्यांसाठी

- उर्वरित 2 BMW अति महत्वाच्या पाहुण्यांसाठी

- निवासस्थान संकुलात मोर, बदकांचा मुक्त वावर

- कर्मचाऱ्यांची संख्या - 250-300

पंतप्रधानांच्या ताफ्यात एकूण ६ BMW गाड्या आहेत. त्यातील २ दिल्लीत वापरल्या जातात, तर २ या देशात इतरत्र दौऱ्यादरम्यान वापरण्यात येतात. अन्य २ BMW या व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी राखीव असतात.

पंतप्रधानांच्या निवासस्थानातल्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे तब्बल २५० ते ३०० इतकी. या संकुलात मोर आणि बदकांचा मुक्त वावर असतो. हे सगळं सांगण्याचं कारण असं, की पंतप्रधानांचं निवासस्थान हलवणं ही अतिशय क्लीष्ट आणि संवेदनशील गोष्ट असणार आहे. त्यामुळे सर्वंकश विचार करूनच त्याबद्दल निर्णय घेऊनच याबाबत निर्णय घेतला जाईल, यात वाद नाही.

=====================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 08:58 AM IST

ताज्या बातम्या