...हा आक्रोश कधी थांबणार ?

...हा आक्रोश कधी थांबणार ?

खरं तर अशी 25 घरं आहेत ज्यांचा आक्रोश आज देशभर घुमतोय. ते प्रत्येक घर, ती प्रत्येक शहीद पत्नी, त्यांच्या मुलांचा ठाहो ऐकला तर पाषाणह्दयी माणूसही हेलावल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

महेश तिवारी, सुकमा

25 एप्रिल : आपल्याकडे जवानांचा आणि किसानांचा कळवळा असणारा एकही नेता किंवा पक्ष सापडणार नाही. आम्ही दोन दिवसांपासून ह्या दोघांबाबतची प्रत्येक बातमी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न एवढाच आहे की सुस्त अशी व्यवस्था जागी व्हावी. बघुयात जवानांबाबतचा हा रिपोर्ट कुठपर्यंत पोहोचतो.

ही फक्त चार दृश्यं आहेत शहिदांच्या घरातल्या आक्रोशाची. खरं तर अशी 25 घरं आहेत ज्यांचा आक्रोश आज देशभर घुमतोय. ते प्रत्येक घर, ती प्रत्येक शहीद पत्नी, त्यांच्या मुलांचा ठाहो ऐकला तर पाषाणह्दयी माणूसही हेलावल्याशिवाय राहणार नाही. पण केंद्रीय राजनाथसिंहांचं निवेदन ऐकलं तर आपला संताप वाढल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांच्या निवेदनात तोच तोच पण आहे.

हा भ्याड हल्ला आहे म्हणून किती काळ नक्षल्यांना सोडून देणार? थोडसं ह्या घटनांची आठवण ठेवा..

जून 2010

26 जवान शहीद

एप्रिल 2010

76 जवान शहीद

मार्च 2016

7 जवान शहीद

जुलै 2016

10 जवान शहीद

मार्च 2017

12 जवान शहीद

आणि आता 25 जवान शहीद. दरम्यानच्या काळात सरकारं बदलली,गृहमंत्रीही बदलले पण ना हल्ल्याचं षडयंत्र बदललं ना आक्रोश थांबला..

नक्षल्यांच्या रक्तपातावर उपाय काय? जेवढे सीआरपीएफचे जवान काश्मीरमध्ये मारले जात नाहीत त्याच्यापेक्षा नक्षली हल्ल्यात मारले जातायत. मग हे संपवायचं असेल तर एकदा स्वकियांच्याविरोधात लष्कराला उतरवावं की सीआरपीएफला आवश्यक ते आधूनिक करावं? प्रश्न कायम आहे आणि त्याचं उत्तर सरकारला शोधायचंय...

First published: April 25, 2017, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading