मध्य प्रदेश, 26 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप स्कँडलनं सध्या मध्य प्रदेशसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेते आणि अधिकाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या या गँगनं त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचं आता समोर आलं आहे.
मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेट उघडकीस आल्यानं देशभरातील अनेक बडे अधिकारी आणि नेत्यांची अक्षरश: झोप उडाली. कारण, या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येताहेत. शिवाय पोलिसांनी आरोपींकडून व्हीआयपींच्या 4 हजार फाईल्स ताब्यात घेतल्यात. या फाईल सेक्स स्कँडल संबंधित आहेत. या फाईल्समध्ये बड्या अधिकाऱ्यांचे सेक्स चॅट, न्यूड व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे. या फाईल्स पोलिसांच्या हाती आल्यानं अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची झोप उडालीय.
कसे अडकले अधिकारी, नेते?
- अधिकाऱ्यांना, नेत्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं
- सेक्स व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करायचं
- ब्लॅकमेल करत कंत्राटं, पैसे मिळवायचे
- गँगनं आयएएस अधिकाऱ्यांची बनवली 'टार्गेट लिस्ट'
- अधिकाऱ्यांची नावं कोड वर्डच्या माध्यमातून नोंदवली
- अधिकाऱ्यांची टार्गेट लिस्ट तपास अधिकाऱ्यांच्या हाती
या गँगनं आतापर्यंत चार राज्यातील महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर आणि मोठ्या व्यापाऱ्यांना आपली शिकार बनवलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मत्स्यपालन, कृषी, उद्योग, वन, जलसंधारण, जनसंपर्क सहित इतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेल्या १३ आयएएस अधिकाऱ्यांची नावं यात आहेत.
इंदूरमधल्या नगरपालिकेच्या एका अभियंत्यानं केलेल्या तक्रारीनंतर देशातील सर्वात मोठ्या हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश झाला. यात आत्तापर्यंत पाच महिलांना भोपाळ आणि इंदूरमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोज नवनवे खुलासे होवू लागल्यानं अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची झोप उडाली.
==================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा