SPECIAL REPORT : नवरदेव झाला झिंगाट, नवरीसमोर हार घेऊनही उभं राहता येईना, पुढे घडलं...

मद्यधुंद अवस्थेत नवरदेवाने आपल्याच वरातीमध्ये तुफान डान्स केला. नवरदेवाची ही अवस्था बघून नवरीही हादरून गेली.

  • Share this:

लखीमपूर, 13 नोव्हेंबर : लग्नात केलेला डान्स एका नवरदेवाला चांगलाच महागात पडला. मंडपात असं काय घडलं की, ज्यामुळे नवरदेवाला नवरीशिवाय परतावं लागलं ?

मद्यधुंद अवस्थेत नवरदेवाने आपल्याच वरातीमध्ये तुफान डान्स केला. नवरदेवानं इतकं मद्य प्राशन केलंय की, त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. मद्यधुंद अवस्थेत भरपूर नाचल्यानंतर नवरदेव हातात हार घेऊन उभा राहिला.

पण, नवरदेवाची ही अवस्था बघून नवरीही हादरून गेली. अशा दारूड्या पतीबरोबर आयुष्य कसं काढायचं हा विचार करून नवरी लग्नाला नकार दिला.

पूजानं हा निर्णय घेतल्यानंत मंडपात एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये ही घटना घडली.

दोन्ही बाजूकडून शब्दानं शब्द वाढत गेला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावं लागलं. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, नवरीनं लग्नाला नकार दिला. दारूड्या युवकासोबत लग्न करणार नाही, अशी भूमिका पूजानं घेतली. अखेर बरेलीहून आलेलं वऱ्हाड नवरीशिवाय परत गेलं. तर पूजानं घेतलेल्या भूमिकेबद्दल तीचं अभिनंदन करण्यात आलं.

=========================

First published: November 13, 2019, 6:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading