SPECIAL REPORT : आदित्य ठाकरे, फडणवीसांविरोधात काँग्रेसने आखली रणनीती, प्रियांकाही उतरणार मैदानात?

SPECIAL REPORT : आदित्य ठाकरे, फडणवीसांविरोधात काँग्रेसने आखली रणनीती, प्रियांकाही उतरणार मैदानात?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास,प्रतिनिधी

दिल्ली, 20 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसनं बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसही पहिली यादी जाहीर करणार आहे. दोन्ही काँग्रेसनी काही जागांची आदलाबदल केली आहे. तसंच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींना प्रचारासाठी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न प्रदेश काँग्रेसकडून केला जाणार आहे. त्यामुळं यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं बुधवारी बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता काँग्रेसनंही आघाडी घेतली. दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची चौथी बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारांच्या पहिल्या यादीतील नावं निश्चित करण्यात आलीत.

विदर्भ मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आदलाबदल करण्यात आला आहे.

तसंच विद्यमान आमदार आणि लोकसभेतील काही उमेदवारांना काँग्रेस विधानसभेच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस आघाडीतील मित्रपक्षांचा निर्णय शुक्रवारी घेतला जाणारा आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोंडी करण्यासाठी काँग्रेसनं वेगळी रणनिती आखली आहे.

तसंच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. नेत्यांच्या गळतीमुळं घायाळ झालेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रियंका गांधी-वॉड्रा यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. विधानसभेसाठी लवकर उमेदवारांची यादी जाहीर करुन रणसंग्रामात काँग्रेस आघाडी घेण्याच्या तयारीत आहे.

मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ कधी दूर होणार हाच खरा प्रश्न आहे.

=====================================

First published: September 20, 2019, 7:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading