हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रयत्नात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी

हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रयत्नात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी

फौजदारी कट, खून, खुनाचा प्रयत्न आणि 2012 मध्ये बी. आर. शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाच्या शूटआऊट प्रकरणात छोटा राजनला शस्त्रे कायदानुसार दोषी ठरवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : छोटा राजनसह सहा आरोपींना मुंबईतील विशेष कोर्टाने दोषी घोषित केलं आहे. ऑक्टोबर 2012मध्ये हॉटेल व्यावसायिक बी.आर. शेट्टी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर 5 जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

फौजदारी कट, खून, खुनाचा प्रयत्न आणि 2012 मध्ये बी. आर. शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाच्या शूटआऊट प्रकरणात छोटा राजनला शस्त्रे कायदानुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

कोण आहे छोटा राजन

छोटा राजनचं खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. त्याचा जन्म 1960 मध्ये मुंबईमधील चेंबूरच्या टिळकनगर वस्तीत झाला. वयाच्या 10व्या वर्षी त्य़ाने चित्रपटाची तिकिटे ब्लॅकने विकण्याचं काम सुरू केलं. दरम्यान, तो राजन नायर टोळीत सामील झाला. गुन्हेगारीच्या जगात नायर ला 'बड़ा राजन' म्हणून ओळखलं जात होतं. राजेंद्र सदाशिव निकाळजे हा नायरचा उजवा हात होता, म्हणून लोक त्याला 'छोटा राजन' म्हणून ओळखायचे.

इतर बातम्या - प्रेमासाठी मुलीने वडिलांच्या गळ्यावर 10 वेळा फिरवला चाकू, बाथरूममध्ये जाळला मृतद

छोटा राजनवर अनेक गुन्हे दाखल आहेत...

छोटा राजनवर अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. छोटा राजन नायर टोळीत असतानाच त्याच्यावर बेकायदेशीर वसुली, धमकी, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न अशी प्रकरणं यापूर्वीही नोंदली गेली होती. दाऊदसोबत सामील झाल्यानंतर त्याचा गुन्ह्यांचा आलेख वाढला. त्याच्याविरूद्ध अनेकांच्या हत्येची प्रकरणंही आहेत.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

Published by: Renuka Dhaybar
First published: August 20, 2019, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading