Home /News /national /

सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातून डीजी वंझारा यांची मुक्तता

सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातून डीजी वंझारा यांची मुक्तता

विशेष सीबीआय न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी डीजी वंझारा यांची सोहराबुद्दीन शेखच्या कथित खोट्या चकमक प्रकरणाच्या खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे. वंझारा यांच्यासोबतच माजी आयपीएस अधिकारी दिनेश एमएन यांचीदेखील मुक्तता करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
विवेक कुलकर्णी, मुंबई 01 आॅगस्ट : मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी डीजी वंझारा यांची सोहराबुद्दीन शेखच्या कथित खोट्या चकमक प्रकरणाच्या खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे. वंझारा यांच्यासोबतच माजी आयपीएस अधिकारी दिनेश एमएन यांचीदेखील मुक्तता करण्यात आली आहे. वंझारा हे गुजरात काडरचे माजी अधिकारी आहेत तर दिनेश हे राजस्थान काडरचे माजी पोलीस अधिकरी आहेत. २०१४ साली कोर्टाने भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनादेखील असाच दिलासा दिला आहे. वंझारा यांनी दिनेश एम एन आणि माजी पोलीस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह २४ एप्रिल २००७ रोजी अटक करण्यात आली होती. तर २०१४ साली वंझारा यांना जामीन मिळाला होता सीबीआयनं सोहराबुद्दीच्या हत्या प्रकरणात कटकारस्थानात पहिल्यापासून सहभागी असल्याचा आरोप वंझारा यांच्यावर ठेवला होता. सीबीआयनं आपल्या आरोपपत्रात गुजरात एटीएसनं सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी यांना हैदराबाद इथं ताब्यात घेतलं आणि गांधीनगर इथं नोव्हेंबर २००५ साली खोट्या चकमकीत मारलं असं म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हा खटला गुजरातमधील मुंबईत चालवण्यात आला. प्रजापती हा सोहराबुद्दीनचा साथीदार अशाच एका चकमकीत २००६ साली मारल्या गेला होता.
First published:

Tags: CBI

पुढील बातम्या