'संस्कृत' बोलल्याने डायबिटीज दूर होतो, भाजप खासदाराने सांगितला अनोखा उपाय!

'संस्कृत' बोलल्याने डायबिटीज दूर होतो, भाजप खासदाराने सांगितला अनोखा उपाय!

भाजपच्या अनेक नेत्यांनी अशाच प्रकारची वक्तव्य केल्याने अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पण हा वाचाळपणा काही थांबत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 12 डिसेंबर : गाय, शेण, गोमुत्र, योग या गोष्टी भाजपसाठी अतिशय प्रिय आहेत. भाजपचे अनेक खासदार त्यासाठी कायम आग्रही असतात. त्यासाठी ते अनेकदा नव नवीन उदाहरणही सांगत दावेही करत असतात. त्यामुळे अनेकदा ते चर्चेचे विषयही बनतात. प्राचीन काळात कायम रमण्याची एक सीमा असते अशी टीका त्यांच्यावर कायम केली जाते. मात्र या खासदारांचं हे असं ज्ञान देणं काही थांबत नाहीये. ज्ञान आणि विज्ञानाचा संगम करताना हे लोक अशी काही वक्तव्य करतात की त्यामुळे त्यांचं हसं होतं. पण लक्षात कोण घेतो हाच खरा प्रश्न आहे. आताची चर्चा सुरू झालीय ती भाजपचे खासदार गणेश सिंग यांच्या वक्तव्याची. संस्कृत भाषेविषयी बोलताना त्यांनी असं काही सांगितलं की सर्वच खासदार हास्यकल्लोळात बुडून गेले.

सुप्रीम कोर्टाच्या 'या' निर्णयाने अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा

एका चर्चे दरम्यान गणेश सिंग हे संस्कृत भाषेवर बोलत होते. संस्कृतचं महत्त्व सांगत असताना ते असं काही बोलून गेले की काय प्रतिक्रिया द्यावी हे अन्य खासदारांना कळतच नव्हतं. गणेश सिंग यांनी संस्कृत ही किती प्राचीन आणि अर्वाचीन भाषा आहे हे सांगितलं. संस्कृतमध्ये सगळं ज्ञान साठलेलं आहे हेही त्यांनी सांगितलं. आज संस्कृत भाषा भारतातून जवळपास नामशेष झालीय याबद्दलही ते बोलले.

तयारी सुरू...'निर्भया' बलात्कार प्रकरणातल्या दोषींना 'या' तारखेला होऊ शकते फाशी

नंतर त्यांची गाडी घसरली ती संस्कृत आणि आरोग्य या विषयावर. ते पुढे म्हणाले, संस्कृत बोलल्याने डायबिटीज दूर होतो. जे लोक ही भाषा बोलतात त्यांना डायबेटीज होत नाही. संस्कृत बोलल्यामुळे कॉलेस्टोरॉलचं प्रमाणही कमी होतं. आपलं हे अगाध ज्ञान सांगताना त्यांनी पुरावे मात्र कुठलेही दिले नाहीत. त्यामुळे सगळेच खासदार त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते.

या आधीही केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी उत्क्रांतीवादाचा सध्याचा सिद्धांत हा चुकीचा असल्याचं सांगत नवीनच थेअरी मांडली होती. त्यामुळे देशभर वादळ निर्माण झालं होतं. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी अशाच प्रकारची वक्तव्य केल्याने अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 09:13 PM IST

ताज्या बातम्या