तुमच्या पेक्षा शाळेतली मुलं बरी, सुमित्रा महाजन यांचे खासदारांना खडे बोल!

तुमच्या पेक्षा शाळेतली मुलं बरी, सुमित्रा महाजन यांचे खासदारांना खडे बोल!

खासदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. सभागृहात त्यांनी आपलं वर्तन योग्य ठेवलं पाहिजे.

  • Share this:

नवी दिल्ली,18 डिसेंबर : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पारा मंगळवारी चागंलाच चढला. आरडा ओरडा, घोषणाबाजी आणि गांधळामुळे संतापलेल्या खासदारांना त्यांनी खडे बोल सुनावले. खासदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. सभागृहात  त्यांनी आपलं वर्तन योग्य ठेवलं पाहिजे. मात्र सध्याची स्थिती वाईट आहे. खासदारांपेक्षा शाळेतरी मुलं बरी, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

संसदेचं अधिवेश सुरू होऊन आता आठवडा होतोय. मात्र खासदारांच्या गोंधळमुळे काहीही कामकाज होऊ शकलं नाही. सभागृह सुरू झालं की सर्व पक्षांच्या खासदारांचा गोंधळ सुरू होतो. महाजन यांनी अनेकदा त्यांना समज दिली परंतू गोंधळ कमी व्हायला तयार नाही त्यामुळं त्या संतप्त झाल्या आहेत.

या लोकसभेचं हे अंतिम सत्र आहे याची आपल्याला जाणीव आहे, खासदारांना आपले प्रश्न उपस्थित करायचे असतात मात्र त्याची ही पद्धत असू शकत नाही. सरकार सर्व प्रश्नांवर चर्चेसाठी तयार आहे. मात्र त्यासाठी कामकाज झालं पाहिजे असंही त्यांनी सांगितंल.

जे विदेशी पाहुणे कामकाज बघण्यासाठी येतात तेव्हा ते विचारतात की तुमच्या इथे काय सुरू आहे. तेव्हा त्यांना काय उत्तर देणार असा सवालही त्यांन केला.

 

VIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट

First published: December 18, 2018, 9:38 PM IST

ताज्या बातम्या