उत्तर प्रदेश पोटनिवडणुकांमध्ये सायकलची कमळाला धडक; योगीच्या गोरखपूर, फुलपूरमध्ये सपाचा झेंडा

उत्तर प्रदेश पोटनिवडणुकांमध्ये सायकलची कमळाला धडक; योगीच्या गोरखपूर, फुलपूरमध्ये सपाचा झेंडा

उत्तर प्रदेशमधल्या फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरू आहे

  • Share this:

14 मार्च : उत्तर प्रदेशमधल्या फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघात  पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला संपत आली असून समाजवादी पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर आहे   . तर योगी आदित्यनाथांनी गेले 25 वर्ष सतत जिंकलेली गोरखपूरची जागा आता गमावल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे निकाल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या एका वर्षानंतर आले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. ही निवडणुक मायावती आणि अखिलेश यादव यांनी सहमतीने लढवली होती.  बसपाने या निवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता.  आज मतमोजणीमध्ये गोरखपूरमध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार प्रवीण निषाद सकाळपासून आघाडीवर होते तर भाजपचे उमेदवार उपेंद्र शुक्ला पिछाडीवर होते.  तर फूलपूर जागेवर सपाचे उमेदवार नागेंद्र सिंह पटेल आघाडीवर होते. आता हे दोघंही विजयाच्या उंबरठ्यावर आहे.  गोरखपूर हे योगी आदित्यनाथचं  क्षेत्र असल्यामुळे या निकालाची खूप चर्चा होते आहे. दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार फुलपूरमध्ये सपाच्या नागेंद्रसिंह पटेलांनी भाजपच्या उमेदवाराचा 59,000 मतांनी पराभव केला. तर गोरखपूरमध्ये 26,000 मतांनी प्रवीण निषाद आघाडीवर आहेत.

आता या पराभवाचे 2019च्या निवडणुकांवर काय परिणाम होतात ह पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

याआधीच्या गोरखपूर,फुलपूरच्या निवडणुका 

मतांची टक्केवारी

गोरखपूर लोकसभा निवडणूक - 2014

-    योगी आदित्यनाथ, भाजप  51.8%

-    रमापती निषाद, सपा 21.8 %

-    अष्टभुजा प्रसाद त्रिपाठी, काँग्रेस 4.4%

-    राम भुआल निषाद, बसपा 17%

 

फुलपूर लोकसभा निवडणूक – 2014

-    केशव प्रसाद मौर्या,भाजप 52.4%

-    धर्मराज सिंह पटेल, सपा 20.3%

-    मोहम्मद कैफ, काँग्रेस 6.1%

-    कपिल मुनी करवरिया 17%

लोकसभेत भाजपला – 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या

लोकसभेत मायावतींना एकही जागा मिळाली नाही

लोकसभेत भाजपला - 42.7 टक्के मतं मिळाली होती.

.......................................................................

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2017

निकाल जाहीर झाले – 11 मार्च शनिवार 2017

एकून जागा – 403

पक्षांना मिळालेल्या जागा

भाजप – 312

सपाकाँग्रेस -54

बसपा – 19

इतर – 18

....................................................

लढवलेल्या जागा ( एकून जागा – 403 )

भाजप - 384

सपा - 298

काँग्रेस - 105

बसपा - 403

.................................................................

मिळालेल्या मत्तांची टक्केवारी 

भाजप – 39.7 टक्के

बसपा – 26 टक्के

सपा – 20 टक्के​

 

First published: March 14, 2018, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading