राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सपा, तृणमूलच्या आमदारांनी केलं क्राॅस वोटिंग

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सपा, तृणमूलच्या आमदारांनी केलं क्राॅस वोटिंग

सपाचे आणि तृणमूलच्या आमदारांनी उघडपणे बंडखोरी करत एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै : राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पक्षादेश म्हणजेच 'व्हिप' लागूच होत नसल्याने, सपाचे आणि तृणमूलच्या आमदारांनी उघडपणे बंडखोरी करत एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलंय.

या निवडणुकीत सपाने मीरा कुमार यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी मुलायम सिंह यांच्याच घरातलं हक्काचं मत फुटलंय. आपण मुलायम सिंह यांच्या इशाऱ्यावरूनच रामनाथ कोविंद यांना मतदान केलं असल्याचं शिवपाल यादव यांनी म्हटलंय. तसंच मीरा कुमार यांच्यापेक्षा मला रामनाथ कोविंद हे अधिक जवळचे वाटतात, ते समावादी विचाराचे असल्याचंही शिवपाल यादव यांनी म्हटलंय.

त्रिपुरामध्येही तृणमुलच्या 6 आमदारांनी ममता दिदींविरोधात बंडखोरी केलीय. त्रिपुरामधल्या 6 आमदारांनी रामनाथ कोविंद यांना मतदान केलंय. आम्ही काँग्रेस, टीएमसी आणि सीपीआय(एम)च्या गुंडगिरीला विरोध करण्यासाठी हे क्रॉस वोटिंग केल्याचं तृणमुलचे त्रिपुराचे आमदार आशिष साहा यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 04:31 PM IST

ताज्या बातम्या