सपाची पहिली यादी जाहीर; अखिलेश यादवांनी वडिलांबाबत घेतला मोठा निर्णय

सपाची पहिली यादी जाहीर; अखिलेश यादवांनी वडिलांबाबत घेतला मोठा निर्णय

काँग्रेस नंतर आता सपानं देखील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुलायम सिंग यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

  • Share this:

लखनऊ, 8 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये आता काँग्रेस नंतर सपानं देखील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सहा जणांच्या या यादीमध्ये सपाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचा देखील समावेश आहे. मुलायम सिंग यादव हे मैनपूरी या ठिकाणाहून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपानं आघाडी केली असून रायबरेली आणि अमेठीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसनं देखील 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये राहुल गांधी अमेठी तर, सोनिया गांधी राय बरेलीतून निवडणूक लढणार आहेत. पहिल्या यादीमध्ये प्रियांका गांधी यांच्या नावाचा मात्र समावेश नाही.

बदायुमधून धमेंद्र यादव सपाच्या तिकीटावर लोकसभेच्या मैदानात उतरतील.सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यादव यांनी यापूर्वीच फिरोजाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे फिरोजाबादमध्ये अक्षय यादव विरूद्ध शिवपाल यादव अशी लढत होणार आहे.

आझमगड आणि मैनपूरीतून मुलायम विजयी

2014मध्ये मुलायम सिंग यादव यांनी आझमगड आणि मैनपुरीतून निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणाहून मुलायम सिंग विजयी झाले होते. दरम्यान, यापूर्वी मुलायम सिंग यादव यांनी 1996, 2004 आणि 2009मध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील मुलायम सिंग विजयी झाले होते. 2009मध्ये तब्बल 1.6 लाख मतांनी सपानं मैनपुरी लोकसभा जिंकली होती.

विदर्भाची कावकाव करणाऱ्यांना ठोकूनच काढायला हवं-उद्धव ठाकरे

काँग्रेसनं जाहीर केली 15 जणांची यादी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली.यामध्ये 15 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत गुजरातमधील 4 तर उत्तर प्रदेशमधील 11 जागांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. तर, राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक मैदानात उतरतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात प्रशांत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रशांत पटेल हे 1997मध्ये एमएस विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांची बडोदामधून काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पटेल यांच्या कारकिर्दीतच स्थानिक पालिका निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी मात्र निराशाजनक होती. परंतु, पटेल हे पाटीदार समुहाचे नेते म्हणून ओळखले जातात. गुजरातमधील पाटीदार समुहांची लोकसंख्या पाहता पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

VIDEO : धनंजय मुंडेंकडून 65 कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

First published: March 8, 2019, 12:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading