मराठी बातम्या /बातम्या /देश /Yogi Adityanath Interview : मुलायम सिंह यादव यांचा 'सपा'नेच केला नाही सन्मान, असं का म्हणाले योगी?

Yogi Adityanath Interview : मुलायम सिंह यादव यांचा 'सपा'नेच केला नाही सन्मान, असं का म्हणाले योगी?

मुलायम सिंह यादव यांचा सन्मान हा मत मिळवण्यासाठी बिल्कुल नाही, त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. समाजवादी पक्षाने त्यांचा कधी सन्मान केला नाही

मुलायम सिंह यादव यांचा सन्मान हा मत मिळवण्यासाठी बिल्कुल नाही, त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. समाजवादी पक्षाने त्यांचा कधी सन्मान केला नाही

मुलायम सिंह यादव यांचा सन्मान हा मत मिळवण्यासाठी बिल्कुल नाही, त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. समाजवादी पक्षाने त्यांचा कधी सन्मान केला नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : समाजवादी पक्षाने त्यांचा कधी सन्मान केला नाही. समाजवादी पक्षाने उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजे, असा सणसणीत टोला योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना लगावला.

ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 के एडिटर-इन-चीफ राहुल जोशी हे योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचा विकासाच्या ब्लू प्रिंटबद्दल योगी आदित्यनाथ खुलासा केला आहे. तसंच मुलायम सिंग यादव यांच्या पद्मविभूषण पुरस्कार वादावर भाष्य केलं.

" isDesktop="true" id="825909" >

नेताजी मुलायम सिंह यादव यांनी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्यावर अनेक जण विनाकारण वाद घालत आहे. मुलायम सिंह यादव यांचा सन्मान हा मत मिळवण्यासाठी बिल्कुल नाही, त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. समाजवादी पक्षाने त्यांचा कधी सन्मान केला नाही. समाजवादी पक्षाने उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजे, असा सणसणीत टोला योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना लगावला.

(Yogi Adityanath Interview : बॉलिवूडच्या बॉयकॉट कल्चरवर योगी आदित्यनाथांची सडेतोड प्रतिक्रिया, म्हणाले...)

'1947 पासून राहुल गांधी काय करत होते. देशात जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर क्षेत्र आणि भाजेचा आधार घेऊन फाळणी तर काँग्रेसच्या काळात झाली आहे. जे त्यांना वारस हक्काने मिळालं आहे, ते देशाला परत करत आहे. हे तेच करत आहे. राहुल गांधी हे आपली नकारात्मक प्रतिमा सोडली तर काँग्रेसला फायदा होईल. पण, ते तसं करत नाही. ते त्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरत आहे. कोणत्या कार्यक्रमामध्ये गर्दी असणे म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळाला असं नसतं. सर्व सामन्य लोकांवर याचा काय फरक पडला, त्यांनी याचा कसा विचार केला हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. पण, देशाला त्यांनी त्यांचा हेतू काय आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींना फटकारलं.

(एमपी, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड निवडणुकीत भाजपचं काय होणार? योगींचं भविष्य!)

विकास कामावरून लक्ष हटवण्यासाठी राम चरित्र मानस याच्यावर विधानं केली जात आहे. लोकसभेमध्ये जेव्हा याचे प्रश्न येईल, तेव्हा त्याचे उत्तर दिले जाईल. राम चरित्र मानस हे पवित्र ग्रंथ आहे. त्याच्याबद्दल मोठी आस्था आहे, उत्तर भारतातील प्रत्येक घरात मंगल कार्य होते, तेव्हा याचे पठण केले जात असते. राम चरित्र हे लोकांना जोडणारे आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गावात राम चरित्र मानसाचे वाचण केले जात आहे. राम चरित्र मानसमध्ये निसाद राज आणि शबरीचे सुद्धा चित्र आहे. हे बुद्धीचा फेरा आहे. ज्या लोकांना राम चरित्र मानसाची माहिती असती तर त्यांनी यावर आक्षेप घेतला नसता, टीका केली नसती, अशा शब्दांत योगींनी विरोधकांना सुनावलं.

First published: