• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • खासदार आझम खान यांना रामपूर कोर्टाचा दणका! पत्नी आणि मुलासह तुरुंगात रवानगी

खासदार आझम खान यांना रामपूर कोर्टाचा दणका! पत्नी आणि मुलासह तुरुंगात रवानगी

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कुप्रसिद्ध असणारे समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आझम खान, त्यांची पत्नी तजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला या तिघांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार तुरूंगात धाडण्यात आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कुप्रसिद्ध असणारे समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला या तिघांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात धाडण्यात आलं आहे. या तिघांनाही 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. बुधवारी आझम खान यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलासहं आत्मसमर्पण केलं होतं. आझम खान यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश न्यायालय-6 (ADJ-6) मध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं. आझम खान यांनी आतापर्यंत 20 प्रकरणांकरता न्यायालयामध्ये जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र मुलगा अब्दुल खानचं बनावट डिग्री आणि बनावट पासपोर्टचं प्रकरण त्यांच्या अंगलट आलं आहे. काय आहे प्रकरण? दोन खोट्या डिग्री असण्याच्या आरोपाखाली आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अनेकदा आझम खान यांच्याकडून न्यायालयाने सुनावणीसाठी दिलेली तारीख चुकवण्यात आली होती. वेळोवेळी गैरहजर राहिल्यामुळे आझम खान आणि त्यांच्या पत्नी-मुलाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आज तिघांनी न्यायालयात हजर होत जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र अनेक वेळा न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे कलम 420 अंतर्गत त्यांचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. जामीनासाठी त्यांना आता हायकोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत. (हेही वाचा-‘दिल्ली हिंसाचार 2002 मधील गुजरात दंगलीसारखाच’, गृहमंत्र्यावर नवाब मलिकांची टीका) रामपूर एसपींकडून या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शंका व्यक्त केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना रामपूरमधील तुरूंगात न ठेवता अन्य कोणत्या तरी तुरूंगात ठेवण्यात येईल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: