..मग पाकिस्तान जाधवांना दहशतवादी वागणूक देणारच, सपा खासदार बरगळले

" पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना जर दहशतवादी मानलं असेल तर त्यांना तशीच वागणूक दिली जाणार "

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 05:09 PM IST

..मग पाकिस्तान जाधवांना दहशतवादी वागणूक देणारच, सपा खासदार बरगळले

27 डिसेंबर : पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना जर दहशतवादी मानलं असेल तर त्यांना तशीच वागणूक दिली जाणार असं म्हणत सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी अकलेचे तारे तोडले.

कुलभूषण जाधव यांच्या भेटीच्या वेळी त्यांची आई आणि पत्नीला पाकिस्तानने वाईट वागवणूक दिली. देशभरात याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मात्र, समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी वादग्रस्त विधान केलंय. कुलभूषण जाधवांना पाकिस्तानने जर दहशतवादी मानलं असेल तर त्यांना तशीच वागणूक दिली जाणार आपण नाही का पकडलेल्या दहशतवाद्यांना वाईट वागणूक देतो तसंच आहे असा युक्तीवादही अग्रवाल यांनी केला.

अग्रवाल यांच्या विधानावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. नरेश अग्रवाल यांचा विधान खेदजनक असून त्यांनी लोकसभेत माफी मागावी अशी मागणी स्वामींनी केली.

अग्रवालांचा यू-टर्न

त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर नरेश अग्रवाल यांना उपरती झाली. मला असं काही म्हणायचं नव्हतं. ज्या प्रकार पाकिस्तान जेलमध्ये भारतीयांचा हाल केले जाताय. त्याचप्रमाणे आपल्या जेलमध्ये पाकच्या सैनिकांचे आणि गुप्तहेराचे हाल केले पाहिजे. त्यांना मोकळीक दिला नाही पाहिजे अशी सारवासारव अग्रवाल यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...