मोदींना बहुमतापासून रोखू शकते आज 12 वाजता होणारी 'ही' घोषणा

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. सपा आणि बसपा या दोन पक्षांमध्ये झालेल्या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपला झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 11:01 AM IST

मोदींना बहुमतापासून रोखू शकते आज 12 वाजता होणारी 'ही' घोषणा

लखनौ, 12 जानेवारी : लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागेल आहेत. दिल्लीची सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेश हे राज्य सर्वाधिक महत्त्वाचं मानलं जातं. याच राज्यात आता पारंपारिक राजकीय विरोधक सपा आणि बसपा यांची आघाडी आता निश्चित झाली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन मायावती आणि अखिलेश यादव दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. सपा आणि बसपा या दोन पक्षांमध्ये झालेल्या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपला झाला होता. पण आता हे दोन पक्ष एकत्र येत आहेत. अशातच मोदींचा लाट काही प्रमाणात ओसरली असल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. असं झाल्यास भाजपला बहुमत मिळवताना मोठी कसरत करावी लागू शकते.

कशी असू शकते सपा-बसपा आघाडी?

ही आघाडी करत असताना या दोघांनीही काँग्रेसला बाजुला सारण्याचा निर्णय घेतला. मात्र अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी तब्बल तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली.

या बैठकीत आघाडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशात 37-37 जागा लढवणार आहेत. तर 2 किंवा 3 जागा राष्ट्रीय लोकदल आणि 2 जागा इतर स्थानिक पक्षांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे अमेठी आणि रायबरेलीच्या लोकसभेच्या जागेवर महाआघाडी उमेदवार देणार नाही.

Loading...

मायावती आणि मुलायमसिंग हे ऐकेकाळचे कट्टर शत्रू. बसपा आणि सपामध्ये विस्तवही जात नव्हता. मात्र मोदी आणि भाजपच्या आव्हानामुळे हे कट्टर राजकीय विरोधक एकत्र आलेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या तब्बल 80 जागा आहेत. त्यामुळं सर्वच पक्षांचं उत्तर प्रदेशवर लक्ष असतं. विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र त्यांना सपाटून मार खावा लागला होता.


'मित्रों...' भुजबळांकडून मोदींच्या मिमिक्रीनंतर तुफान हशा, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...