30 मे : सर्वजण ज्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते त्या मान्सूनचे अखेर केरळ आणि इशान्येकडील राज्यांमध्ये येऊन धडकला आहे. सर्वसाधारणपणे एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेली सर्वसामान्य जनतेसह, बळीराजाला मान्सूनच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.
केरळमध्ये 30 मे रोजी मान्सून दाखल होईल, असं पूर्वानुमान हवामान विभागाने 15 दिवसांपूर्वीच वर्तवलं होतं. सध्या मान्सूनसाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने अरबी समुद्र तसंच मालदिव, बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही मान्सून वेगाने दाखल होण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही मान्सून वेगाने दाखल होण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. शिवाय यावर्षी राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस होईल, असंही साबळे यांनी म्हटलं आहे.
केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून पावसाची नोंदीही समाधानकारक आहे. या नोंदींच्या आधारावर मान्सूनचे पुर्वानुमान व्यक्त करण्यात आले होते. त्यानुसार केरळसह व इशान्येकडील राज्यात आज सकाळी मान्सून दाखल झाला.
मान्सूनचा पाऊस का महत्वाचा?
.............................................