Alert : आता दक्षिणेतून होऊ शकतो दहशतवादी हल्ला, लष्कराला मिळाली ही गुप्त माहिती

पाकिस्तान सीमेच्या जवळ असणाऱ्या सर क्रीकमधून दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 09:09 PM IST

Alert : आता दक्षिणेतून होऊ शकतो दहशतवादी हल्ला, लष्कराला मिळाली ही गुप्त माहिती

पुणे, 9 सप्टेंबर : पाकिस्तान सीमेच्या जवळ असणाऱ्या सर क्रीकमधून दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. सर खाडीच्या भागात काही सोडून दिलेल्या नौका भारतीय लष्कराच्या हाती लागल्या आहेत. अज्ञात इसमांनी त्या तिथे सोडल्या आहेत. लष्कराला मिळालेल्या गुप्तचरांच्या माहितीनुसार, दक्षिण भारतात दहशतवादी हल्ला होऊ शकतो. लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी या लष्कराच्या सदर्न कमांडच्या मोठ्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे. लेफ्ट. जनरल सैनी यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचं मुख्यालय असणाऱ्या पुण्यातच ही माहिती जाहीर केली.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे सतर्क राहा असा इशारा केरळ पोलिसांनाही देण्यात आला आहे. केरळपासून गुजरातपर्यंतच्या किनारपट्टी भागाला हाय अलर्ट देण्यात आला आहे. चेन्नई पोलिसांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात गुजरात पोलिसांनी कच्छच्या बंदराजवळची सुरक्षा कडक केली होती. तिथून घुसखोरी होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. आता आर्मी कमांडरनी दिलेल्या या माहितीमुळे हा धोका अजून वाढला असण्याचं लक्षण आहे.

VIDEO : पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरी करत होते अतिरेकी

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात गरळ ओकणं सुरू केलं. आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा काही त्यांना मिळवता आला नाही आणि त्यामुळे आता या मार्गाने भारतावर हल्ला करण्याच्या ते तयारीत आहेत. याविषयी भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनीसुद्धा गेल्या महिन्यात इशारा दिला होता.

भरधाव कारमधून रस्त्यावर पडली दीड वर्षाची चिमुकली, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 09:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...