दक्षिण भारत काँग्रेससाठी लकी! इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

वायनाड येथे विजय मिळवत राहुल गांधी काँग्रेसला उभारी देणार का? हे पाहावं लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 09:50 AM IST

दक्षिण भारत काँग्रेससाठी लकी! इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

नवी दिल्ली, 01 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड या लोकसभा मतदरसंघातून देखील निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर आता विरोधकांनी तोंडसुख घ्यायला सुरूवात केली आहे. पण, इतिहसात डोकावून पाहता दक्षिण भारत काँग्रेससाठी लकी ठरला आहे असं म्हणता येते. कारण, पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नव्या उमेदीनं उभं राहण्याचं बळ दक्षिण भारतानं काँग्रेसला दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी वायनाड लकी ठरणार का?हे पाहणं औत्सुक्याचं आहे. यापूर्वी इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी देखील दक्षिण भारतातून निवडणुका जिंकत काँग्रेसला उभारी दिली होती.


इंदिरा गांधींसाठी दक्षिण भारत लकी

आणीबाणीनंतर झालेल्या 1977च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधी यांना देखील समाजवादी नेते राज नारायण यांच्याकडून रायबरेली येथे पराभवाचा सामना करावा लागला.

पण, 1978मध्ये कर्नाटकमधील चिकमंगलूर येथे पोटनिवडणुकीची घोषणा झाली. काँग्रेसला उमेद देण्याची ही संधी इंदिरा गांधी यांनी वाया दवडली नाही. चिकमंगलूरमधून इंदिरा गांधी या विजयी झाल्या आणि त्यानंतर 1980च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.


राष्ट्रवादावर निवडणूक का लढू नये? -अमित शहा


सोनिया गांधींनी देखील मारली बाजी

1998मध्ये देखील काँग्रेसची घडी विस्कटली होती. राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव होता. या कठीण काळात सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. यावेळी सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना जोरदार विरोध केला.

1999मध्ये काँग्रेसनं सोनिया गांधी यांना उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि कर्नाटकातील बेल्लारी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं. यावेळी सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना आव्हान दिल्यानं निवडणुकीत 'घर की बेटी और विदेशी बहू' असा सामना रंगला. सुषमा स्वराज यांनी अवघ्या 30 दिवसांमध्ये कन्नड भाषा शिकली आणि स्थानिकांशी संवाद साधायला सुरूवात केली.


सुषमा स्वराज यांचा पराभव

निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सोनिया गांधी यांनी 56 हजार मतांनी सुषमा स्वराज यांचा पराभव केला. पण, काँग्रेसला मात्र विजय मिळाला नाही. या पराभवानंतर देखील सुषमा स्वराज यांना केंद्रीय मंत्री बनवलं गेलं. बेल्लारीतील विजयानंतर सोनिया गांधी यांनी स्वत:ला सिद्ध केलं. त्यानंतर 2004मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये युपीएनं विजय मिळवत सरकार स्थापन केलं.

हा सारा इतिहास पाहता राहुल गांधी वायनडमधून विजयी होणार का? काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.


SPECIAL REPORT: कधी संपणार प्रदेश काँग्रेसमधल्या लाथाळ्या?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close