कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता; चक्रीवादळानं बदलली दिशा

कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता; चक्रीवादळानं बदलली दिशा

  • Share this:

पुणे, 19 नोव्हेंबर - दक्षिण बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ लक्षद्वीपकडे सरकलं असून, यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालंय. तर पुढच्या 48 तासात कोकण आणि महाठवाड्यात पुणे वेध शाळेनं पावसाची शक्यता वर्तवलीय. तर कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतल्या दुष्काळी पट्ट्यासह जळगाव आणि मनमाड शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली असल्याची माहिती आहे.

दक्षिण बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळानं अचानक दिशा बदलली असून, ते आता लक्ष्यद्वीपकडे सरकलं आहे. या बदलामुळे मुंबई, कोणक आणि मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातारण तयार झालं असून, अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर येत्या 48 तासात कोकण, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

दक्षिण बंगालपासून तयार झालेलं हे चक्रीवादळ लक्षद्वीपकडे सरकल्यामुळेच राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून, येत्या ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केलाय. पावसामुळे वातावरणातील थंडावा अधिक वाढणार असून, त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

जळगाव आणि मनमाडमध्ये पाऊस

जळगाव शहरात दुपारी काही वेळ पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोमवारी सकाळपासूनच जळगावात ऊन सावलीचा खेळ सुरु होता. त्यातच 4 साडेचार वाजता अचानक आकाशात ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी बरसल्या. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. अगदी काही मिनिटांच्याच या सरी होत्या त्यामुळे सध्या तरी जळगावात नुकसानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकलाय. तसेच सकाळ पासून वातावरणात असलेल्या उकड्यापासून थोड्याफार प्रमाणात का होईना जळगावकारांना दिलासा मिळाला आहे

मनमाड शहर परिसरात सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची काहीशी तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या काळात तापमानात वाढ होऊन उष्मा जाणवत होता. त्यातच सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वाना सुखद धक्का दिला. मनमाडमध्ये सुमारे 20 मिनटं पावसाच्या हलक्या सारी बरसल्या.

कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं

कोल्हापूर आणि सांगली जिल्हात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. तसंच या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील ऊस तोडींवर आणि भाताच्या मळणीवर होणार आहे.

कोल्हापूर शहराला मध्यरात्री दोन वाजता मुसळधार पावसाने झोडपलं. सुमारे अर्धा तास शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. काल (रविवार) दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. तेव्हापासूनच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर मध्यरात्री सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. शहरासह जिल्ह्यातल्या चंदगड, राधानगरी तालुक्यातील काही भागातही पाऊस पडला आहे. या पावसाचा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या ऊस तोडींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातल्याही अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, या पावसाचा मोठा फटका पिकांना बसणार आहे. दरम्यान, आता काही ठिकाणी पाऊस होत असला तरीही महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा पाऊस रुसलेला पाहायला मिळाला आहे. अनेक भागांत दुष्काळाची भीषण स्थिती आहे.

LIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 07:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading