चेन्नई, 8 डिसेंबर : तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये (Kunnur) आज खूप मोठी दुर्घटना घडली आहे. लष्कराचं Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कुन्नर येथे कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat), त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह लष्करातील ज्येष्ठ अधिकारी होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आपघातात सहभागी असलेल्या 14 पैकी 13 जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या सर्व जवानांच्या मृतदेहाची डीएनए टेस्ट केल्यानंतर त्यांच्या ओळखीची पुष्टी केली जाणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.
कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची आतापर्यंत समोर आलेली नावे :
- लेफ्टनंट हरजिंदर सिंग
- एनके गुरसेवक सिंग
- एनके जितेंद्र सिंग
- एल/एनके विवेक कुमार
- एल/एनके बी. साई तेजा
- HAV सतपाल
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सकाळी 9 वाजता दिल्लीवरुन रवाना झालं होतं. त्यानंतर ते सकाळी 11 वाजून 35 वाजता कोईम्बतूरला उतरलं. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता सुलूरहून हे विमान रवाना झालं होतं. त्यानंतर दुपारी कुन्नूरजवळ दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी अपघात झाला.
संबंधित घटनेच्या माहितीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट दिली. तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बिपीन रावत यांच्या घरी आता नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमू लागले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रावत यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेची माहिती राजनाथसिंह उद्या संसदेत देण्याची शक्यता आहे. त्याआधी सिंह हे घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अपघाताच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली आहे. त्यानंंतर मोदी यांची संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.