S M L

सोनू तेरा `पीएनबी` मे अकाऊंट है का?, व्हिडिओ व्हायरल

नीरव आणि कंपनीने दिवसाढवळ्या राजरोसपणे बँकेला कसं लुटलं याच्या अनेक सुरस कथा बाहेर येत असतानाच एक गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 23, 2018 05:27 PM IST

सोनू तेरा `पीएनबी` मे अकाऊंट है का?, व्हिडिओ व्हायरल

मुंबई,  २३ फेब्रुवारी : सोशल मीडियामुळे आता काहीच लपून राहत नाही. कर्जबुडव्या ‘हिरा’ नीरव मोदीमुळे पंजाब नॅशनल बँकेची लाज गेली. नीरव आणि कंपनीने दिवसाढवळ्या राजरोसपणे बँकेला कसं लुटलं याच्या अनेक सुरस कथा बाहेर येत असतानाच एक गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय. ते गाणं आहे, सोनू तेरा `पीएनबी` मे अकाऊंट है का? बँकेची महती सांगणारं आणि बँक ग्राहकांना काय काय सुविधा देते याची माहिती या विडंबन गीतात देण्यात आलीय.

महिला कमर्चाऱ्यांनी वर्षभरापूर्वी बँकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात हे गाणं म्हटलं होतं. तुमचं पीएनबीमध्ये अकाऊंट आहे का? बँकेशी तुम्ही नातं जोडणार का? असे अनेक प्रश्न या गाण्यात विचारण्यात आले आहेत. सकाळी १० ते ५ या वेळेत कामावर येत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या सामान्य कर्मचाऱ्यांना काय माहीत की काही पांढरपेशे हिरे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनं बँकेला लुटत आहेत. या कर्मचाऱ्यांनी हे गाणं पुन्हा पाहिलं तर नक्कीच त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. आता कोण उघडणार अकाऊंट आणि कोण जोडणार नातं असा प्रश्न त्यांना नक्कीच पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 02:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close