गोवा, 28 डिसेंबर : राजकारण्यांना आपण नेहमी पाहतो ते एका मुखवट्यातच. पण जेव्हा मुखवट्यामागचा त्यांचा चेहरा समोर येतो, तेव्हा तो वेगळाच असतो. असंच काहीसं झालं सोनिया गांधींचं. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सोपवल्यानंतर निश्चिंत झालेल्या सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. आणि चक्क सायकल चालवतायत.
२६ डिसेंबरला त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. दक्षिण गोव्यातील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या मित्रमंडळींसह त्या आल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत केल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या गोव्याचा निरोप घेतील.त्यांनी हॉटेलच्या आवारात मनमुराद सायकलिंगचा आनंद लुटला.