Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

TikTok स्टारची गळा आवळून हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये अशा अवस्थेत सापडला मृतदेह

TikTok स्टारची गळा आवळून हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये अशा अवस्थेत सापडला मृतदेह

कुंडली येथे शिवानी ही 'टच एंड फेअर' नावाचं सलून चालवत होती. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे.

कुंडली येथे शिवानी ही 'टच एंड फेअर' नावाचं सलून चालवत होती. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे.

कुंडली येथे शिवानी ही 'टच एंड फेअर' नावाचं सलून चालवत होती. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे.

नितिन अंतिल, (प्रतिनिधी)

सोनीपत, 29 जून: हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनीपत जिल्ह्यातील कुंडली परिसरात एका टिक-टॉक स्टारची गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवानी खोबियान असं या स्टारचं नाव आहे. शिवानीचा मृतदेह सलूनमधील बॉक्स बेडमध्ये आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...सुशांतला सलमान खानने दिली होती धमकी; गायकाचा VIDEO तून धक्कादायक आरोप

मृत शिवानी बहीण आणि मित्राने बेड उघडला असता त्यात मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसांनी सांगितलं की, कुंडली येथे शिवानी ही 'टच एंड फेअर' नावाचं सलून चालवत होती. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे. शिवानीच्या हत्याचा आरोप कुंडली येथील आरिफ नामक तरुणावर ठेवण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे.  शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बॉक्स पलंगमध्ये ठेवून आरोपी फरार झाला आहे.

शिवानीची बहीण श्वेता हिने सांगितलं की, 26 जूनला आरिफ हा शिवानीला भेटालयला तिच्या ब्यूटी पार्लरमध्ये आला होता.  श्वेतानं फोन केल्यानंतर शिवानीनं तिला आरिफबाबत सांगितलं होतं. त्या रात्री शिवानी घरी आलीच नाही. रात्री श्वेताने तिला मेसेज केला होता. मी हरिद्वारला आली असून मंगळवारी घरी परतेल असा,  शिवानीने तिला रिप्लाय दिला होता.

बेडचा बॉक्स उघडताच दिसला मृतदेह...

शिवानीचा फोन लागत नसल्यानं श्वेताला संशय आला. तिने मित्र नीरज याच्या मदतीनं ब्यूटी पार्लरचा दरवाजा उघडला. मात्र, आत प्रचंड दुर्गंधी पसरली होती. श्वेता आणि नीरजचा संशय आणखी बळावला. नीरज याने बेडचा बॉक्स उघडला असता त्यात शिवानाची मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शिवानीचे वडील विनोद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरिफविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

दरम्यान,  मनोरंजन क्षेत्रातून एका पाठोपाठ एक दु:खद वृत्त समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर 10 दिवसांनी सुप्रसिद्ध टिक-टॉक स्टार सिया कक्कड हिने आत्महत्या केली होती. सिया हिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

हेही वाचा...सुशांतच्या चाहत्यांसाठी खुशखबर; फ्रीमध्ये पाहता येणार त्याचा शेवटचा चित्रपट

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस तपास करत असतानाच सिया कक्कड हिने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Entertainment, Sonipat S07p06, Tiktok