Home /News /national /

सोनिया गांधींची प्रकृती अद्याप अस्थिर, 'या' संसर्गामुळे होतोय त्रास

सोनिया गांधींची प्रकृती अद्याप अस्थिर, 'या' संसर्गामुळे होतोय त्रास

गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी एस राणा यांनी सोमवारी एका मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितले की...

    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : देशाची राजधानी दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात रविवारी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दाखल करण्यात आलं आहे. सर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी एस राणा यांनी सोमवारी एका मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितले की सोनिया गांधींनी रविवारी सायंकाळी 7 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी सुरू आहे. त्यांना पोटात संसर्ग (Infection) झाल्याने त्यावर उपचार सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस प्रमुख सोनिया गांधी शनिवारी बजेट सादर करीत असताना संसदेत उपस्थित नव्हत्या. याआधीही सोनिया गांधी यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सोनिया गांधी या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या.अचानक पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील गंगाराम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावरून काही काळ दूर झाल्या होत्या. त्यांच्या जागी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांची मनधरणीही करण्यात आली. परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम होते. मात्र, काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाची धुरा पुन्हा एकदा हाती स्विकारल्यानंतर सोनिया यांनी पुन्हा एकदा राजकारणात जोमाने सहभागी झाल्या आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress chief, Sonia gandhi

    पुढील बातम्या