Home /News /national /

सोनिया गांधींची प्रकृती स्थिर; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

सोनिया गांधींची प्रकृती स्थिर; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

रविवारी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

    नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाचे चेअरमॅन डॉ. डिएस राणा यांनी माहिती दिली की सोनिया गांधी यांना 30 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या नियमित तपासणी आणि चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. डीएस राणा यांनी स्वास्थ बुलेटिनमध्ये सांगितले की 30 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता सर गंगाराम रुग्णालयात भर्ती झालेल्या सोनिया गांधी यांना आज दुपारी 1 वाजता रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे वाचा-मोदी सरकारमधील मंत्र्यांची धावपळ; अमित शहा पॉझिटिव्ह आल्याने लागण होण्याची भीती त्यांची तपासणी केली जात असून त्यात चांगली सुधारणा आहे. गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress, Sonia gandhi

    पुढील बातम्या