News18 Lokmat

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

यांना तात्काळ दिल्लीतील गंगाराम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2017 08:49 PM IST

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

27 आॅक्टोबर : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडलीये. त्यांना तात्काळ दिल्लीतील गंगाराम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

सोनिया गांधी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होत्यात. पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील गंगाराम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्यामुळे डाॅक्टरांची एक टीम शिमल्याला पाठवण्यात आली होती.

सर गंगाराम हाॅस्पिटलचे चेअरमन डी.एस.राना यांनी सांगितलं की, सोनिया गांधी यांना संध्याकाळी 5 वाजता हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर डाॅक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...